Reve Party Dainik Gomantak
महाराष्ट्र

रेव्ह पार्टीवर रेड, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीसह 22 जणांवर कारवाई

महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) जिल्ह्यात स्काय ताज व्हिला (Sky Taj Villa bungalow) नावाच्या बंगल्यात रेव्ह पार्टी (Reve Party) सुरू झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

दैनिक गोमन्तक

नाशिक: महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) जिल्ह्यात इगतपुरी (Igatpuri) येथील मानस रिसॉर्टच्या एका भागात आज पहाटे पोलिसांनी छापा टाकला. या रिसॉर्टच्या (resort's) स्काय ताज व्हिला (Sky Taj Villa bungalow) नावाच्या बंगल्यात रेव्ह पार्टी (Reve Party) सुरू झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने कारवाईचा बडगा उगारला. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि छापा टाकला. (Big Boss fame Actress Found in Rave Party At Nashik)

बंगल्याच्या आत मोठ्या आजावात म्युझीक सुरू होते. डान्स आणि मजा सुरू होती. रेव्ह पार्टी चालू होती. चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या 4 महिलाही या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. यापैकी एका महिलेने बिग बॉसमध्ये भाग घेतला आहे. एकूण 10 पुरुष आणि 12 महिला या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या रेव्ह पार्टीवर झापा टाकून 22 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

बॉलिवूड हिरोइन ड्रग्ज घेतांना सापडली

या आधी बॉलिवूड अभिनेत्री ड्रग पार्टी मध्ये मुंबईत पकडली गेली होती. सांताक्रूझ परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये संबंधित अभिनेत्रीला तिच्या मित्रांसह रंगेहाथ पकडले गेले होते.

नायिका मित्रासह पकडली गेली

पोलिसांना पार्टीमध्ये ड्रग्स वापरल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला आणि अभिनेत्रीला तिच्या मित्रासह अटक केली. हॉटेलच्या खोलीत ती मित्राबरोबर चरस पित होती. तीचा मित्र आशिक हुसेन यालाही पोलिसांनी अटक केली. यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. दोघांनाही कोर्टात हजर केले असता नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. तिने बॉलिवूडसह तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बेजबाबदार लोकांना त्यांची काळजी नाही

ड्रग्ज आणि बॉलिवूड कनेक्शन असलेली प्रकरणे सतत समोर येत आहे, आगामी काळात, रेव्ह पार्टी आणि ड्रग्स पार्टीमध्ये सामील असलेल्या लोकांमध्ये बॉलिवूडचे एक ना एक कनेक्शन चव्हाट्यावर आले आहे. आज इगतपुरीच्या रेव्ह पार्टीवरील पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पुन्हा बॉलिवूडमध्ये ड्रग्स, दारू आणि पार्टी कल्चर किती खोलवर रूजले आहे हे दिसून आले आहे. आज जेव्हा देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे, तेव्हा शासन प्रशासन याबाबत शक्य ते प्रयत्न करत आहे. वारंवार सामाजिक अंतर राखण्याची आणि मास्क घालण्याची विनंती लोकांना करतांना दिसत आहे. तसेच काही शहरांमध्ये कडक निर्बंधासहीत लॉकडाउनही लावण्यात आले आहे, मात्र पार्टी करणाऱ्या अशा बेजबाबदार लोकांना त्यांची काळजी नाही. असे चित्रच अरेंज होत असलेल्या रेव्ह पार्टीच्या माध्यमातून दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT