Sanjay Raut In Bharat Jodo Yatra Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sanjay Raut In Bharat Jodo Yatra: जामिनावरील सुटकेनंतर आता संजय राऊत भारत जोडो यात्रेत जाणार का?

Sanjay Raut In Bharat Jodo Yatra: आता संजय राऊत भारत जोडो यात्रेत जाणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

दैनिक गोमन्तक

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल शंभर दिवसांनी जामीन मिळाला आहे. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार का या चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) नांदेड जिल्ह्यातून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. या यात्रेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या यात्रेमध्ये संजय राऊत उपस्थित राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत दिसणार आहे. 11 तारखेला नांदेड येथे होणाऱ्या सभेला आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेसाठी जाण्यासाठी उत्सुक देखील आहेत. त्या दृष्टीने तयारी देखील करण्यात आली आहे. सभा आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत. उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेही काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याने त्याची उत्सुकता शिवसेनेच्या नेत्यांसह विरोधकांनाही लागून राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Office Recruitment 2026: 10वी पास तरुणांसाठी खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये 130 पदांवर भरती; अर्ज कुठे करावा? अर्जाची अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व

Saptakoteshwar Temple History: शिल्पावशेषांतून उलगडतोय दिवाडीच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहास; कदंब स्थापत्याला नवा उजाळा

Iran America Conflict: "हबीबी, इराणला या!" युद्धाच्या धमकीवर तेहराननं उडवली ट्रम्पची खिल्ली; 3 डी गेमचा VIDEO केला शेअर

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; सुप्रीम कोर्टाचा 'MACP' संदर्भात महत्त्वाचा निर्णय

DJ Controversy: पुण्यात 'DJ'चा सवाल; गोव्यात नरकासुराचे काय?

SCROLL FOR NEXT