Before the 26/11 attacks, Tahvur Rana had conducted a survey of many properties in Mumbai. Dainik Gomantak
महाराष्ट्र

26/11 हल्ल्यापूर्वी मास्टर माइंडने केली होती गर्दीच्या ठिकाणांची रेकी, तपासात समोर आली माहिती

२६ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा हल्ला २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू होता. यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडंट, ताजमहाल पॅलेस आणि टॉवर, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन कम्युनिटी सेंटर आदी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते.

Ashutosh Masgaunde

Before the 26/11 attacks, Tahvur Rana had conducted a survey of many properties in Mumbai:

सध्या कॅलिफोर्निया तुरुंगात असलेल्या तहव्वूर राणाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी गुन्हे शाखेने मंगळवारी मुंबई विशेष न्यायालयात अर्ज सादर केला असून, तो भारतात प्रत्यार्पणासाठी पात्र असल्याचे आढळले आहे. प्रत्यार्पण प्रक्रियेला आणखी विलंब करत राणाने या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

२६/११ च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ४०५ पानांच्या पुरवणी आरोपपत्रानुसार राणाने पवईतील एका हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबत दक्षिण मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी रेकी केल्याचे उघड झाले आहे.

आरोपपत्रात म्हटले आहे की, राणाने मुंबईतील अशा काही ठिकाणांना भेट दिली, जिथे नंतर हल्ले झाले.

आरोपपत्रानुसार, तो नोव्हेंबर 2008 मध्ये पवईतील एका हॉटेलमध्ये थांबल्याचे पोलिसांना आढळले. त्याने त्याच्या पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत हॉटेलमध्ये जमा केली होती.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, हॉटेल कर्मचाऱ्याचे जबाब नोंदवल्यानंतर "आम्हाला आढळले की त्याने शहरातील गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली आणि त्यापैकी काही ठिकाणांना हल्लेखोरांनी लक्ष्य केले, ज्यात सीएसएमटीचा देखील समावेश आहे."

तहव्वूर राणा कॅलिफोर्निया तुरुंगात

मंगळवारी मुंबई गुन्हे शाखेने तहव्वूर राणाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटसाठी याचिका दाखल केली आहे, जो सध्या कॅलिफोर्निया तुरुंगात आहे.

अमेरिकेतील एका न्यायालयाने त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे, मात्र राणाने या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला विलंब होत आहे.

तथापि, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे म्हणणे आहे की त्यांचा युक्तिवाद न्यायालयात टिकणार नाही आणि लवकरच त्यांचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाईल.

26/11 रोजी काय झाले?

2008 मध्ये झालेल्या मुंबई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांसह एकूण 166 लोक मृत्यूमुखी पडले होते. पाकिस्तानातून समुद्रमार्गे मुंबईत आलेल्या 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी एकाच वेळी शहरातील प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला होता.

अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आणि त्यानंतर त्याच्यावर खटला चालवण्यात आला. विशेष न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात कसाबला फाशी देण्यात आली.

२६ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा हल्ला २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू होता. यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडंट, ताजमहाल पॅलेस आणि टॉवर, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन कम्युनिटी सेंटर आदी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT