Another death threat to Mukesh Ambani, now demanding 200 crores Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mukesh Ambani Threat: मुकेश अंबानींना जीवे मारण्याची आणखी एक धमकी, आता मागितले २०० कोटी

Mukesh Ambani: यापूर्वी आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये लिहिले होते, "जर तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला ठार मारू. आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत."

Ashutosh Masgaunde

Another death threat to Mukesh Ambani, now demanding 200 crores:

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना धमकीचा ईमेल आला आहे. ज्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

मुकेश अंबानींनी दिलेली धमकी मागे घेण्याच्या बदल्यात ईमेल करणाऱ्याने 200 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

अंबानींना धमकी देत ​​ईमेलद्वारे लिहिले होते की, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत. यापूर्वी मुकेश अंबानी यांच्याकडून 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि जर त्यांनी पैसे दिले नाहीत तर त्यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली होती.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना शनिवारी एका अज्ञात व्यक्तीकडून 200 कोटी रुपयां ची मागणी करणारा धमकीचा ईमेल आला.

याआधी शुक्रवारीही (27 ऑक्टोबर) त्यांना धमकीचा ईमेल आला होता. ज्यामध्ये, मुकेश अंबानी यांनी २० कोटी न दिल्यास त्यांना गोळ्या घालण्यात येतील, असे त्या ईमेलमध्ये म्हणण्यात आले होते.

अंबानींच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे गमदेवी पोलिस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरला दुजोरा देताना मुंबई पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "पहिला ईमेल, ज्यामध्ये २० कोटी रुपयांची मागणी आणि मागणी पूर्ण न झाल्यास गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली होती, नंतर शनिवारी या अज्ञात व्यक्तीने आणखी एख इमेल पाठवत धमकी दिली. ज्यामध्ये 200 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे.

पहिल्यांदा मिळालेल्या धमकीला प्रतिसाद न दिल्याने त्याच इमेलवरून दुसऱ्यांदा धमकीचा मेसेज आला. ज्यामध्ये ही रक्कम 20 कोटींवरून 200 कोटी रुपये करण्यात आली.

आधीच्या धमकीच्या ईमेलमध्ये लिहिले होते, "जर तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला ठार मारू. आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत."

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी फेब्रुवारी महिन्यातही एका व्यक्तीने नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया उडवून देण्याची धमकी दिली होती.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चेअरमनला मिळालेल्या धमकीच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT