Anna Hazare Dainik Gomantak
महाराष्ट्र

अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली;मुख्यमंत्र्यांकडून चौकशी

मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे यांनी अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

दैनिक गोमन्तक

समाजसेवक (Social worker) अण्णा हजारे यांची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडली. छातीत दुखू लागल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. रुबी हॉल क्लिनिकचे (Ruby Hall Clinic) वैद्यकीय अधीक्षक डॉ अवधूत बोदमवाड यांनी सांगितले की, अण्णा हजारे यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

अण्णा हजारे यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उद्धव ठाकरे यांनी अण्णा हजारे लवकरात लवकर बरे व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले की, अण्णा हजारे यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सर्वाधिक ओळख दिल्ली आंदोलनातून

पुण्यातील 84 वर्षांचे अण्णा हजारे हे देशातील अनेक मोठ्या आंदोलनांचे नेतृत्व करण्यासाठी ओळखले जातात. माहितीच्या अधिकारासाठी (Right to Information) त्यांनी काम केले. जनलोकपाल लागू करण्याच्या मागणीसाठी 2011 मध्ये केलेल्या उपोषणामुळे त्यांना सर्वाधिक मान्यता मिळाली. दिल्लीतील हे आंदोलन अण्णा आंदोलन या नावाने जगभर ओळखले जात होते. त्यामुळे त्यांना भारताबाहेरही ओळख मिळाली. अण्णा हजारे यांना भारत सरकारने (Government of India) पद्मभूषण (Padma Bhushan) देऊन सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT