sexually abusing children Dainik Gomantak
महाराष्ट्र

गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

मुलीच्या आईनेच तक्रार दाखल केल्याने अज्ञाताविरोद्धात गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

पुणे : शिवाजीनगर परिसरातील गर्ल्स हायस्कूलमध्ये एका 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोद्धात गुन्हा दाखल आहे. तर पोलिसांनी तपास सुरु केला असून याप्रकरणी पीडित मुलीच्या आईनेच तक्रार दाखल केली आहे. (An 11-year-old girl was sexually abused in a girls' high school toilet)

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या एका गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात एका अज्ञाताने 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Abused) केला. त्या अज्ञाताने त्या मुलीला जबरदस्तीने टॉयलेटमध्ये (Toilet) नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्या मुलीने घडलेला हा प्रकार मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर ही माहिती शिक्षकांना देण्यात आली. घडलेल्या प्रकाराचे गांभिर्य पाहत शिक्षकांनी मुलीच्या पालकांना आणि पोलिसांना फोन करुन हा प्रकार सांगितला. घडनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियांका नरनावरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शाळेत पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केली.

त्यानंतर या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात पॉक्सो (Poxo) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस (Police) अधिक तपास करत आहेत. त्याचबरोबर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केल्याचे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT