अमित शाह

 

Dainik Gomantak

महाराष्ट्र

अमित शाहांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल...

दैनिक गोमन्तक

पुणे: केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये आले. त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे (Dagdusheth Halwai Ganpati) दर्शन घेतले. त्यानंतर अमित शाह यांनी मंदिरात प्रार्थना केली. शाह पुण्यातील नवीन सीएफएसएल इमारतीचे उद्घाटन केले. आणि NDRF च्या जवानांसोबत भोजन केले. ते वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहिले होते. यानंतर त्यांनी पुणे महापालिकेतील मराठा योद्धा छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन सुद्धा केले.

यानंतर त्यांनी भाजप (BJP) कार्यकर्त्यांशी सवांद साधला, यावेळी बोलत असताना ते म्हणले, उद्धव ठाकरें याना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा विश्वासघात केला, असा हल्लाबोल अमित शाह यांनी केला. ते पुण्यात सभेत बोलत होते. यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रातील राज्य सरकारवर (state government) सडेतोड टीका केली. तसेच त्यांनी शिवसेने (Shiv Sena) निशाणा साधला तसेच 2019 च्या निवडणुकीत (Election) भाजपबरोबर शिवसेना पक्षाने विश्वासघात केला आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होणार हे मातोश्रीवरील बैठकीत ठरवलं होत. परंतु मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने हिंदुत्व बाजूला ठेवले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होते यासाठी 2019 मध्ये भाजप सोबत त्यांनी विश्वासघात केला आणि मुख्यमंत्री झाले. तसेच सत्तेतून बाहेर या आणि दोन - दोन हात करुन दाखवा असे खुले आवाहन त्यांनी केले. मग पहा जनता कुणाला कौल देते. तसेच महाराष्ट्रातील तिन्ही पक्षाने एकत्र येऊन भाजपला हरवून दाखवले. असेही आव्हान त्यांनी दिले आहे.

महाराष्ट्र सरकारने पेट्रोल स्वस्त केले नाही परंतु त्यांनी दारु स्वस्त केली. ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेल स्वस्त का केले नाही? देशातील अनेक राज्यानी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले आहेत. परंतु महाविकास आघाडी सरकारने दारुवरील कर कमी केला आहे, असा आरोपही अमित शाह यांनी यावेळी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, ठाकरे सरकार फक्त सत्ता सत्ता करत आहे. या सरकारने दारू स्वस्त केली. पेट्रोल- डिझेल स्वस्त करणारे गरजेचे आहे. हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन भाजपाला ऋण दाखवावं. महाराष्ट्र चा विकास फक्त भाजप च करेल. हा विकास करणे पुण्याचा लोकांच्या हातात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT