Maharashtra-Karnataka Border Dispute Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra-Karnataka: ऐन वादात राष्ट्रवादीचा बडा नेता पोहचला थेट बेळगावात; संजय राऊत म्हणाले...

बोम्मई यांनी अमित शहांची भेट घेतल्याने काही होत नाही अशी उर्मट प्रतिक्रिया दिली होती.

Pramod Yadav

Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळला असून दोन्ही राज्यात यावरून राजकारण होताना दिसत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) वादग्रस्त विधाने करून या वादात तेल ओतण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासदारांनी नुकतेच गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यावरून देखील बोम्मई यांनी अमित शहांची भेट घेतल्याने काही होत नाही अशी उर्मट प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात सीमाप्रश्नावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील गावांना कर्नाटक सरकाने (Karnataka Govt) पाणी सोडल्याने हा वाद आणखीनच वाढला आहे. अशात राष्ट्रवादीचा एक बडा नेता व विद्यमान आमदारांनी थेट बेळगावात जाऊन प्रसिद्ध मंदीराला भेट दिली आहे. राष्ट्रवादी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी नुकतेच बेळगाव शहरातील दख्खनचा राजा जोतिबा मंदिराचे दर्शन घेतले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवासानिमित्त रोहित पवार यांनी बेळगावात जाऊन जोतिबाचे दर्शन घेतले. (MLA NCP leader Rohit Pawar Visit Belgavi)

"बेळगाव शहरातील दख्खनचा राजा जोतिबा मंदिराचे दर्शन घेतले. मराठी भाषिकांच्या लढ्याला यश येऊन बेळगावसह संपूर्ण मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, यासाठी दख्खनचा राजा जोतिबाला यावेळी साकडे घातले." असे ट्विट देखील रोहित पवार यांनी घेतले.

यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रोहित पवार यांचे कौतुक करत राज्य सरकारवर टीका केली आहे. "जय महाराष्ट्र! मंत्री पोहोचले नाहीत. पण रोहित पवार बेळगावात पोहोचले!इच्छा आणि हिम्मत असली की आडवे येणारे पळून जातात." असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. यावर संजय रोहित पवारांनी जय महाराष्ट्र अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी रोहित पवारांनी बेळगावातील शांताई वृद्धाश्रमाला भेट दिली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वृद्धाश्रमाला मदत देखील केली. यानंतर आमदार रोहित पवार यांनी करवीर निवासिनी श्री.अंबाबाईचे दर्शन घेतले. तसेच, दिवगंत प्रा.डॉ.एन.डी पाटील यांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानी भेट घेऊन कुटुबियांची विचारपूस केली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT