Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

'मलिकच मंत्री' मात्र बिनखात्याचे

मलिकां यांच्याकडील अल्पसंख्याक मंत्रीपद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे

दैनिक गोमन्तक

मुंबई : गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्राचे राजकारणात नवाब मलिक यांच्या प्रकरणाने तापतं आहे. तर मलिक यांच्या राजीनाम्याची मागमी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांच्या घरी तातडीची बैठक बोलावली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुमारे दोन तास बैठक झाली. या बैठकीनंतर नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाची जबाबदारी अन्य नेत्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पाटील म्हणाले की, 'मलिकच मंत्रीपदावर राहणार. ते तुरुंगात असल्याने आणि मंत्रालयाचे काम करू शकत नसल्याने त्यांच्या मंत्रालयाची जबाबदारी तातडीने दुसऱ्या कोणाकडे दिली जाईल. त्याप्रमाणे मलिकां यांच्याकडील अल्पसंख्याक मंत्रीपद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. (Allocation of various ministerial portfolios from Nawab Malik)

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना 23 फेब्रुवारीला ईडीने (ED) अटक केली. त्यानंतर सातत्याने नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली. मात्र शरद पवार यांनी राजीनामा घेणार नसल्याचं जाहीर केलं होते. दरम्यान विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) पुन्हा नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. शिवाय त्यांच्याकडे असणाऱ्या खात्यातील कामे कशी होणारं असा सवाल उपस्थित केला होता. विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या मागणीमुळे अखेर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली आणि नवाब मलीक यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचे वाटप केलं. मात्र नवाब मलिक मंत्रिपद कायम ठेवलं आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा (Resigned) न घेता महविकास आघाडी सरकारने मलिक यांना पाठबळ देण्याचे काम केलं आहे.

मलीक यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचे वाटप

जितेंद्र आव्हाड : अल्पसंख्याक मंत्री

राजेश टोपे : कौशल्य विकास मंत्री

धनंजय मुंडे : पालकमंत्री परभणी

प्राजक्त तनपुरे : पालकमंत्री गोंदिया

राखी जाधव : कार्याध्यक्ष मुंबई

नरेंद्र राणे : कार्याध्यक्ष मुंबई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT