आदित्य ठाकरे Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आमच्यावर आरोप -आदित्य ठाकरे

Maharashtra: AU म्हणजे कोण हे स्पष्ट झाले पाहिजे,अशी मागणी राहुल शेवाळेंनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. सभेमध्ये राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीला AUचे ४४ कॉल आले होते. हे AU म्हणजे कोण हे स्पष्ट झाले पाहिजे,अशी मागणी राहुल शेवाळेंनी केली आहे.

त्याचबरोबर, AU म्हणजे आदित्य ठाकरे असे सूचक विधान केले आहे.आदित्य ठाकरेंनी याबद्दल बोलताना, मुख्य विषयांपासून विचलित करण्यासाठी त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आमच्यावर असे घाणेरडे आरोप केले जात आहेत असे म्हटले आहे. विरोधी पक्षाला सभेत बोलण्याची संधी दिली जात नाही, माईक बंद केले जातात. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde ) बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत, त्यांनी पद रिकामे केले पाहिजे. त्याचबरोबर, जे राज्यपाल सतत महापुरुषांचा अपमान करतात त्यांना सुद्धा राज्याबाहेर जायला हवे. अशा मागण्या आम्ही विधानसभेत केल्या आहेत असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांचे 110 कोटीच्या नागपुर भूखंड घोट्याळ्यात नाव समोर आले आहे , त्यांना वाचवण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. राहुल शेवाळेंचे लग्न कसे टिकवले हे ठाकरे घराण्याला माहित आहे. ज्यांची निष्ठा घरच्यांशी नसते त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे असेही आदित्य ठाकरेंनी वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT