Akasa Air  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Pune To Goa Akasa Flight: पुण्यातून सात जणांची एक टीम गोव्यात होणाऱ्या वेस्टर्न झोन ज्युनियर (अंडर-१८) शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी मंगळवारी जाणार होती.

Pramod Yadav

पुणे: विमानतळावर झालेल्या सुरक्षा तपासणीच्या विलंबामुळे सहा नेमबाजांना गोव्यात होणाऱ्या शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेला मुकावे लागले आहे. अकासा एअरच्या शस्त्रे आणि दारूगोळा वाहतुकीबाबतच्या धोरणांबद्दल गोंधळ निर्माण झाल्याने तपासणीला विलंब झाला. गोव्यात होणाऱ्या वेस्टर्न झोन ज्युनियर (अंडर-१८) शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी सात नेमबाज मंगळवारी (१६ सप्टेंबर) संध्याकाळी पुण्याहून गोव्याला निघाले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातून सात जणांची एक टीम गोव्यात होणाऱ्या वेस्टर्न झोन ज्युनियर (अंडर-१८) शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी मंगळवारी जाणार होती. ही टीम अकासा एअरच्या QP-११४३ या फ्लाइटने संध्याकाळी ५:२५ वाजता पुणे विमानतळावरुन गोव्यासाठी निघणार होती. यासाठी टीम दुपारी २:३० वाजता विमानतळावर दाखल झाली.

विमानतळावर दाखल झाल्यानंतर, शस्त्रे आणि दारूगोळा यांची कशी वाहतूक केली जावी याबाबत स्पष्टता नसल्याने खेळाडूंना वेळेत विमानात चढता आले नाही. सातपैकी केवळ एकच खेळाडू विमानात प्रवेश करु शकला पण, त्याला शूटींग किट विमानतळावर ठेवावे लागल्याने त्यालाही स्पर्धेत कादचित सहभागी होता येणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

खेळाडू मुलांसोबत त्यांचे पालक देखील विमानतळावर यावेळी हजर होते. विमान प्रवासासाठी आवश्यक सर्व कागदपत्र प्रक्रिया पूर्ण केली असून, विमानतळावर देखीव विविध अर्ज भरल्याची माहिती पालकांनी दिली. शस्त्रे वाहतुकीबाबत सर्व नियमांचे पालन केले होते, असेही खेळाडुंचे पालक म्हणाले.

"अकासा एअरचे कर्माचारी खूप उद्धट वागले, त्यांनी तपासणीत विलंब केला आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही", असा आरोप या खेळाडुंनी आरोप केला.

अकासा कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सुरक्षा तपासणीत विलंब झाल्याने नेमबाजांची टीम विमानात वेळेत प्रवेश करु शकले नाहीत. गोव्यातील स्पर्धेला जाण्यासाठी आमचा ग्राऊंड स्टाफ खेळाडुंना आवश्यक ती मदत करत आहे, अशी माहिती अकासाने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC T20 क्रमवारीत मोठा फेरबदल! अभिषेक शर्मा नंबर 1 वर कायम तर सूर्या-तिलक वर्मा यांची घसरण

Goa Drug Bust: थिवी रेल्वे स्थानकावर 3.5 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, 25 वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Goa Live Updates: मुंगुल हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला सशर्त जामीन मंजूर!

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

SCROLL FOR NEXT