Maharashtra Politics Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या 'या' मंत्र्यांवर आहेत भ्रष्टाचाराचे आरोप

Ajit Pawar: विरोधक आधीच भाजपल भ्रष्टाचाराची 'वॉशिंग मशीन' असल्याचा आरोप करत असतात, त्याला महाराष्ट्रात राजकीय घडमोडींमुळे आता आणखी हवा मिळाली आहे.

Ashutosh Masgaunde

NCP Leaders Facing Corruption Charges: भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) ज्यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत होता, त्या राष्ट्रवादीचे नेते आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.

विरोधक आधीच भाजपल भ्रष्टाचाराची 'वॉशिंग मशीन' असल्याचा आरोप करत असतात, त्याला महाराष्ट्रात राजकीय घडमोडींमुळे आता आणखी हवा मिळाली आहे.

अशात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यापैकी बहुतांश जण महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सहभागी झाले आहेत.

अजित पवार

ईडीकडे अजित पवारांविरुद्धच्या तपासांची मोठी यादी आहे. यात सहकारी बँक घोटाळा आणि सिंचन घोटाळ्याची प्रकरणे महत्त्वाची आहेत. तसेच त्यांच्या कंपनीवरही गैरव्यवहाराचा खटला सुरू आहे.

ईडीने 2021 मध्ये स्पार्कलिंग सॉईल प्रा. विरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दाखल केलेल्या आरोपपत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नीची नावे नसली तरी ज्या कंपनीविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे ती कंपनी अजित पवार आणि त्यांच्या पत्नीची आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून देण्यात आलेल्या कर्जात अनियमिततेचे आरोप आहेत.

याच आरोपावर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या आधारे ते आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीला सामोरे जात होते. मनी लाँड्रिंगचा तपास करण्यासाठी ईडीने याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता.

छगन भुजबळ

गेल्या रविवारी महाराष्ट्रा च्या सरकारमध्ये शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांपैकी अनेकांवर ईडीची कारवाई सुरू आहे. त्या आमदारांमध्ये छगन भुजबळ यांचाही समावेश आहे.

सध्या छगन यांच्यावर २००६ साली सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना १०० कोटी रुपयांची कंत्राटे देण्यात अनियमितता झाल्याचा गुन्हा दाखल आहे.

भुजबळ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) च्या अहवालाच्या आधारे, ईडीने एक वेगळा मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता ज्यामध्ये त्यांना 2016 मध्ये अटक करण्यात आली होती.

हसन मुश्रीफ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झालेले राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हेही ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. त्यांच्याविरुद्ध सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात अनियमिततेचा गुन्हा दाखल झाला आहे. ज्याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

प्रफुल्ल पटेल

ईडीने नुकतेच माजी नागरी उड्डयन मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची काही संपत्ती जप्त केली होती, ज्यात दिवंगत अंमली पदार्थ तस्कर इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेशी संबंधित चौकशीचा भाग आहे.

पटेल आणि त्यांच्या कुटुंबाचे सीजे हाऊसमधील चार मजले, त्यांच्या 15व्या मजल्यावरील निवासासह, ईडीने गेल्या वर्षी जुलैमध्ये तात्पुरते जप्त केले होते, ज्याला नुकतेच न्यायनिवाडा करणार्‍या प्राधिकरणाने पुष्टी दिली.

ED ने ऑक्टोबर 2019 मध्ये पटेल यांची 15 मजली व्यावसायिक इमारतीच्या बांधकामासाठी त्यांची कंपनी, मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मिर्ची यांच्यातील कथित 2006-07 संयुक्त उपक्रमाच्या चौकशीचा एक भाग म्हणून चौकशी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT