Ahmedabad Plane Crash Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात कोकणची लेक हरपली; क्रू मेंबर अपर्णा महाडिकचा मृत्यू , खासदाराशी होतं जवळचं नातं

Plane Crash Aparna Mahadik Death: गुरुवारी (१२ जून) अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या अपघातात एकूण 265 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Sameer Amunekar

गुरुवारी (१२ जून) अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या अपघातात एकूण 265 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यात महाराष्ट्रातील 10 नागरिकांचा समावेश आहे. या दुर्घटनेमध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील एअर इंडियाच्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक (वय 35) या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपर्णा महाडिक ही गेल्या अनेक वर्षांपासून एअर इंडिया विमान सेवेत कार्यरत होत्या. अपघातग्रस्त बोईंग विमानात त्या नियमित ड्युटीवर होत्या.

गुरुवारी अहमदाबाद येथून एअर इंडिया विमानानं उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही वेळात विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते थेट अहमदाबादमधील इमारतीवर आदळून कोसळले. या भीषण अपघातात अपर्णा यांना आपले प्राण गमवावे लागले.

विशेष म्हणजे, अपर्णा ही रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत्या. अमोल महाडिक हेही एअर इंडियात कार्यरत आहेत. अपर्णा यांच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या मूळ गावी आणि सध्या राहत असलेल्या मुंबईतील घरी शोककळा पसरली आहे.

अपघातग्रस्त विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. एअर इंडियाने याबाबत तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. अपर्णा महाडिक यांचा दुर्दैवी अंत केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकणवासीयांसाठी मोठा धक्का ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT