Goa Politics: भ्रष्टचाराचे आरोप, पण तपास नाही! गोमेकॉतील वाद राष्ट्रीय पातळीवर; सरकार सर्वत्र अपयशी, पाटकरांचा घणाघात

Amit Patkar: पाटकर म्हणाले, श्रमशक्ती भवनाजवळ बॅग घेऊन फाईल मंजूर केल्या जातात, असा एका मंत्र्याने आरोप केला. त्या आरोपाचा तपासही केला जात नाही.
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोमेकॉतील डॉक्टर व मंत्र्यांचा वाद हा राष्ट्रीय पातळीवर पोहोचला. राज्यातील सरकार सर्वपातळीवर अपयशी ठरले असून, ते बरखास्त करावे, अशी मागणी राज्यपालांकडे काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

काँग्रेस भवनात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अखिल ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसचे (एआयपीसी) आरोग्यसेवा प्रमुख डॉ. आदित्य रेड्डी, ‘एआयपीसी’चे उपप्रमुख डॉ. शिखिन सोनी, माजी महापौर तथा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांची उपस्थिती होती.

पाटकर म्हणाले, श्रमशक्ती भवनाजवळ बॅग घेऊन फाईल मंजूर केल्या जातात, असा एका मंत्र्याने आरोप केला. त्या आरोपाचा तपासही केला जात नाही. माजी आमदाराने २० ते ३० लाख रुपये घेऊन आरोप केला होता, याचीही आठवण करून दिली. एवढे गंभीर आरोप होऊन त्याचा तपास करण्याचे सौजन्य सरकार दाखवत नाही.

Amit Patkar
Goa Politics: 'भ्रष्टाचाराची लाट' आणि 'कोलमडलेली कायदा-सुव्यवस्था' काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल!

बहुमातचे सरकार असूनही डॉक्टर-मंत्री वादाच्या विषयावर ठोस निर्णय घेण्यात आला नाही, हे सरकारचे अपयश आहे. आता गोविंद गावडेंचे काय झाले, याविषयी राज्य सरकारने स्पष्ट भूमिका मांडायला हवी. वैद्यकीय क्षेत्राबरोबर राज्य सरकारने पूर्णपणे तडजोड केली असल्याचे दिसत आहे.

Amit Patkar
Goa Congress: पर्रीकरांनी विरोध केलेल्या रेल्वेचा दुहेरी मार्ग रेटण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा सरकारवर आरोप; पोलिसांच्या भूमिकेवर टीका

मांद्रेमध्ये २०१६ मध्ये तुये इस्पितळ गेली नऊ वर्षांपासून सुरू होऊ शकले नाही. अलिकडच्या घटनांवरून राज्यातील कायदा, सुव्यवस्था ढासळली आहे. गोमेकॉतील या विषयाची आरोग्य सचिवांच्या नेतृत्वाखालील समिती चौकशी करेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सचिव मंत्र्यांची चौकशी कसे करू शकतात, असा प्रश्‍न पाटकर यांनी उपस्थित केला. राज्यपालांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती पाटकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com