Chief Minister Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

रुटीन चेक-अपनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा घरी परतले

महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज सकाळी एच एन रिलायन्स रुग्णालयात (HN Reliance Hospital) गेले.

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज सकाळी एच एन रिलायन्स रुग्णालयात (HN Reliance Hospital) गेले. मात्र मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक असून ते नियमित तपासणी करण्यासाठी रुग्णालयामध्ये गेले होते, अशी माहिती देण्यात आली आहे. तासाभराच्या तपासणीनंतर मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा रुग्णालयातून घरी परतले.

मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान 'वर्षा बंगला' एच एन रिलायन्स हे रुग्णालय जवळच आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आल्यानंतर त्यांना याच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वत: गाडी चालवत आजा एच एन रुग्णालयामध्ये पोहोचले. तिथे त्यांची नियमित चाचणी करण्यात आली. रुग्णालयातून मुख्यमंत्री ठाकरे बाहेर असल्याने रुग्णालयाच्या आसपास कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता.

2012 मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयामध्ये (Lilavati Hospital) अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया (Angioplasty surgery) करण्यात आली. ते नियमित आरोग्याची तपासणी करण्यासाठी लिलावती रुग्णालयामध्ये जातात. मात्र ते मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकवेळा ते वर्षा निवासस्थानी त्यांचा मुक्काम असतो. त्यामुळे यावेळी त्यांनी एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये जाणं पसंत केले. शिवसेनेचे पक्षप्रमुखही उध्दव ठाकरे आहेत. मंत्र्यांशी सल्लामसलत, समन्वय मुख्यमंत्री साधत असतात. राज्यात कोरोनाची परिस्थिती अद्याप सावरली असताना विकास कामे थांबू नयेत म्हणून सतत कार्यशील असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT