Konkan floods: 38 killed in a lansslide in a village based in Raigad district of Konkan region Twitter
महाराष्ट्र

Konkan Floods: निसर्गाचा कोप आमच्यावरच का? येवा कोकण संकटाच्या भोवऱ्यात

बघूया कसा झाला कोकणवासीयांवर पावसाचा कहर:

Akshay Badwe

आधी निसर्ग नंतर तौकते आणि आता जलप्रलय (Konkan floods). ज्या वादळामुळे कोकणात (Konkan Monsoon) अतोनात नुकसान झाले होतं त्यातून सावरत असतानाच पावसाने कोकणवासीयांना अजून एक दुःखद धक्का दिला आहे. (After cyclone Nisarga, Tauktae, Konkan faces battle against heavy rains)

कोकणात गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस अक्षरशः कोसळतोय. कोकणात आता असा एकही जिल्हा राहिला नाही जिथे या पावसाने थैमान घातले नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड यासारख्या अनेक जिल्ह्यात आणि गावागावात गेल्या काही दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी मात्र या पावसाने आपले रौद्ररूप दाखवले. कोकणाच्या अनेक भागात आज दरडी कोसळणे तसेच नद्यांना पूर येणे हे चित्र दिसून आले. रायगड मध्ये एका गावात दरड कोसळून 38 जणांना आपला जीव गमवावा लागला तर दुसऱ्या बाजूला चिपळूण मध्ये कोरोना हॉस्पिटलमध्ये पाणी शिरल्यामुळे आठ जण मृत्युमुखी पडले. बघूया कसा झाला कोकणवासीयांवर पावसाचा कहर:

रायगड आणि रत्नागिरी

रायगड मधल्या चिपळूण मधली परिस्थिती भयवाहक होती. वशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. संपूर्ण शहराला पुराच्या मोठा फटका बसला. बाजारात पाणी शिरल्यामुळे लोकांची एकच तारांबळ उडाली. पुरामुळे अनेक घरांचे तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले.

बुधवारी सायंकाळी एका हॉस्पिटल मध्ये पुरामुळे आठ पेशंटचा मृत्यू देखील झाला. एन डी आर एफ (NDRF)तसेच कोस्टल गार्ड चिपळूण मध्ये बचावकार्य युद्धपातळीवर करताना दिसत आहेत.

रायगडमध्ये तर सह्याद्रीने जणू एक गावच गिळुन टाकलं. रायगडच्या महाडमध्ये तळई गावात दरड कोसळून 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोंगराळ भाग असल्यामुळे बचावकार्यात विलंब झाला. महाड तालुक्यात अनेक ठिकाणी पूल पडण्याच्या तसेच रोड वाहून गेल्याच्या घटना बुधवारी घडल्या.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग मध्ये देखील पावसाने आपली दमदार हजेरी लावली. गेल्या दोन-तीन दिवसापासून सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला तसेच आंबोली घाटात दरड कोसळली. जिल्ह्यातली तिलारी नदी धोक्याची पातळी पार करत वाहत आहे. त्यामुळेच तिलारी अंतराज्य प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी घराघरात पाणी शिरले अनेकांचे संसार अक्षरशः पाण्यात वाहून गेले.

तटरक्षक दल, एन डी आर एफ तसेच लष्कराच्या मदतीने बचाव कार्य युद्धपातळीवर चालू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT