वाशिम: आपल्या देशात कोरोना लसीबद्दल (Vaccine) अनेक गैरसमज आहेत. कुठे लोकं पळून गेलेत तर काही ठिकाणी लोकांनी पाण्यात उड्या घेतल्या, कोरोना लसिकरणाच्या भितीने लसीकरण केंद्राकडे अनेक ठिकाणी पाठ फिरवली जात असल्याचे आपण बघतो आहे. मात्र या उलट काही ठिकाणी लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये सकारात्मक परिणाम दिसायला लागले आहेत. महाराष्ट्र राज्यातील वाशिममधील एका आजींची नऊ वर्षांपासून गेलेली दृष्टी (eyesight back) लस घेतल्यानंतर परत आल्याचा दावा केला जात आहे. (After Covishield vaccine Maharashtra woman gets eyesight back)
वाशिम जिल्ह्यातील रिसोड गावच्या बेंदरवाडी येथे राहणाऱ्या मथुराबाई बिडवे या 70 वर्षांच्या आजीचे आयुष्य गेल्या 9 वर्षांपासून अंधारामय होते. मोतीबिंदूमुळे बुबुळ पांढरी झाली आणि दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. मथुराबाई या मुळच्या जालना जिल्ह्यातील परतूरच्या राहणा-या आहेत. रिसोडमध्ये त्या आपल्या नातलगांकडे राहतात. त्यांनी 26 जूनला कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला होता.
या आजीला लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका डोळ्यांने 30 ते 40 टक्के दिसायला लागल्याचा दावा करण्यात येत आहे. आधी मथुराबाई लस घेण्यास तयार नव्हत्या त्यांना भीती वाटत होती. इतरांसारखाच त्याच्या त्याच्या मनामध्येसुद्धा लसीबद्दल चूकीचा समज होता. मात्र कुटुंबीयांनी आग्रह केला आणि त्यांनी लस घेतली. त्यानंतर हा चमत्कार घडल्याचं घरची मंडळी सांगत आहेत.
डॉक्टरांनी मात्र लस घेतल्यावर असं काही होत नाही किंवा अशी शक्यताही नाही.असे सांगत आहेत. या घटनेचा सखोल अभ्यास करावा लागेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मथुराबाईंच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाश आला असला तरी हा नेमका लसीचा परिणाम आहे की अन्य काही कारणामुळे त्यांची दृष्टी परत आली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आजीची दृष्टी लसिमुळे परत आली की आणखी कोणते दुसरे कारण आहे. हे संशोधनानंतरच समजेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.