गिरीश चौधरी यांच्या अटकेमुळे खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. Dainik Gomantak
महाराष्ट्र

अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर ईडीचा मोर्चा एकनाथ खडसेंकडे

भोसरीतील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना काल ईडीने अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: भोसरीतील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी यांना काल ईडीने (Ed) अटक केली आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेमुळे खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

युती सरकारच्या काळात खडसे यांना भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी आपले मंत्रीपद गमवावे लागले होते. त्यानंतर खडसे आणि त्यांची मुलगी शारदा यांना ईडीने चौकशीसाठी बोलाविले होते.

त्यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना देखील चौकशीसाठी बोलावले होते. मंगळावारी दिवसभर त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना रात्री अटक करण्यात आली आहे. चौधरी यांच्या अटकेमुळे भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी सोबत गेलेले एकनाथ खडसे यांना झटका बसला आहे.

गेले काही दिवस महाविकास आघाडीच्या मागे ईडीचे वादळ घोंगावत आहे. कधी माहाविकास आघाडीतील नेते तर कधी त्यांचे नातेवाईक यांच्या मागे हा ईडीचा ससेमीरा लावला जात आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) , प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) आणि आता एकनाथ खडसे यांच्याकडे ईडीचा मोर्चा वळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT