Aditya Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे आणि बंडखोर आमदार सुहास कांदे आमनेसामने येण्याची शक्यता

Suhas Kande: शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे अदित्य ठाकरे यांची भेट घेणार

दैनिक गोमन्तक

Shiv sena: शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील संघर्ष अजुन तीव्र होत आहे. आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रा काढून महाराष्ट्र भर दौऱ्याला गुरूवार पासुन सुरूवात केली आहे. आज ही यात्रा नाशिकला पोहोचणार आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे यांनी अदित्य ठाकरे यांची भेट घेण्याचे जाहीर केले आहे.

कांदे म्हणाले की, मी आदित्य ठाकरेंना भेटून आमची काय चूक झाली ते विचारणार आहे. मी त्यांना विचारेन की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण पुढे जात असू तर त्यात गैर काय आहे.

अशा परिस्थितीत सुहास कांदे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात. सुहास कांदे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली,आज मी माझ्या समर्थकांसह आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहे. मी शिवसेना संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांना फोन केला होता. मला आदित्य ठाकरेंना भेटायचे आहे, असे मी त्यांना सांगितले.

अशा परिस्थितीत आता आदित्य ठाकरे आणि बंडखोर आमदार सुहास कांदे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबंस्त तैनात केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुहास कांदे यांनी अनेक मुद्द्यांवर आदित्य ठाकरेंकडून उत्तरे मागितली आहेत. आदित्य ठाकरेंविरोधात आम्ही काहीही बोलणार नाही,असं ते म्हणाले. मातोश्री आमचे पंढरपूर आहे. उद्धव साहेब आमचे विठ्ठल आहेत .

त्यामुळे आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही. पण मला आदित्य ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे. काल त्यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या हातात भगवा धागा दिसत नव्हता. हातातील शिवबंधन गेले कुठे? हिंदूत्वाचा त्याग केला आहे का, असा सवाल केला कांदे यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT