Silver Oak Attack News Dainik Gomantak
महाराष्ट्र

'सिल्वर ओक'वरील हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांवरही कारवाई; योगेश कुमारांची बदली

करणाला वेगळे वळण मिळाले असून, आता या प्रकरणात पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Kavya Powar

Silver Oak Attack News : गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हा संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनला होता. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत सरकारलाच आव्हान दिले होते. अखेर यावर आता सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना 22 तारखेपासून कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक येथील घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (8 एप्रिल) हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणात 110 जणांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपल्या ताब्यात घेतले आहे. दरम्यान प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, आता या प्रकरणात पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. (Action against Mumbai Police in Silver Oak attack case; DCP Yogesh Kumar replaced)

माहितीनुसार, झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवले असून दुसऱ्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाची कारवाई विश्वास नांगरे पाटील यांनी केली आहे. सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

राजकारणातील महत्वाची व्यक्ती म्हणून ओळख असलेले शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीच्या घरावर हल्ला करण्यात येतो ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा हल्ला झाल्यामुळे आता पोलीस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. ज्या ठिकाणी हल्ला होतो त्या ठिकाणी मीडियाचेवाले पोहोचतात मग सुरक्षा यंत्रणा, पोलीस का नाही पोहोचू शकत असा प्रश्न या प्रकरणात उपस्थित झाला आहे.

या हल्ल्याची FIR नोंद झाली असून या FIR मधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. 8 तारखेला दुपारी 3 वाजता आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार आहेत हे पोलिसांना कळाले होते. पण 7 तारखेला गुणरत्न सदावर्ते यांनी भाषणात सिल्व्हर ओक येथे जाण्याचा उल्लेख केला होता. तेव्हाच आझाद मैदान येथे जे पोलिस उपस्थित होते त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली होती तरी देखील शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला गेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT