Sangamner Acid Attack Dainik Gomatak
महाराष्ट्र

शाळा सुटली, पण घर गाठण्यापूर्वीच काळ आला! 6 वीतील चिमुरडीवर अ‍ॅसिड फेकून नराधमानं काढला पळ; महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा

Ahilyanagar Crime News : महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली.

Manish Jadhav

Sangamner Acid Attack: महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात मंगळवारी (17 मार्च) एका अज्ञात नराधमाने सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर भररस्त्यात अ‍ॅसिड फेकून हल्ला केला. ही घटना त्या वेळी घडली जेव्हा ही मुलगी शाळा सुटल्यानंतर रोजच्याप्रमाणे आपल्या घराकडे पायी परतत होती. अचानक समोरुन आलेल्या एका अज्ञात तरुणाने काहीही न बोलता या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले आणि घटनास्थळावरुन पसार झाला. या भीषण हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिला आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

या जीवघेण्या हल्ल्यात ही विद्यार्थिनी गंभीररीत्या होरपळली असून तिच्या किंकाळ्या ऐकून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. नागरिकांनी तातडीने तिला लोणी येथील प्रवरानगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या डॉक्टरांचे एक विशेष पथक तिच्यावर उपचार करत असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पीडित मुलगी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले असून तिची आई मजुरी करुन आपल्या मुलांचा आणि वृद्ध सासू-सासर्‍यांचा उदरनिर्वाह करते. या घटनेमुळे एका हसत्या-खेळत्या गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

त्याचवेळी, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथके तयार केली असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

अद्याप या हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, परंतु आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी (Police) केला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे कडक निर्बंध असतानाही बाजारपेठेत अ‍ॅसिडची सहज उपलब्धता कशी होते, असा गंभीर प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT