Hinganghat Case Update Dainik Gomantak
महाराष्ट्र

हिंगणघाट जळीतकांड हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेप

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर अखेर न्यायालयाने आरोपीस आजन्म कारावास शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक

एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेला (Teacher) जिवंत जाळण्यात आलं आहे, हिंगणघाट (Hinganghat) जळीतकांड प्रकरणी न्यायालय आज निकाल लागला आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्ष पूर्ण होताना आज हा निकाल सुनावण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती. (Hinganghat Case Update)

आज न्यायालयात शिक्षेच्या प्रमाणाबद्दल युक्तीवाद करण्यात आला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने शिक्षेच्या प्रमाणाबद्दल युक्तीवाद करताना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली होती. तर बचाव पक्षाने या प्रकरणी तपास नीट झालेला नसून दोषीला कमीत- कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती, तसेच दोषी विकेश नगराळेचे आई- वडील वृद्ध आहेत. तसेच त्याला एक लहान मुलगी आहे.

यामुळे त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. दरम्यान या प्रकरणाची गंभीरता पाहता व समाजामध्ये पुन्हा अशा प्रकारचे कृत्य करण्यास कोणी धजावू नये म्हणून, सरकारी पक्षाने आरोपीस कठोरात कठोर शिक्षा द्यावी असा युक्तिवाद केला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर अखेर न्यालयाने (Court) आरोपीस आजन्म कारावास शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT