supriya sule Dainik Gomantak
महाराष्ट्र

Abdul Sattar on Supriya Sule: सुप्रिया सुळेंवर टीका करताना कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची जीभ घसरली

कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे

दैनिक गोमन्तक

नेहमीच राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील 24 तासांत अब्दुल सत्तार यांनी माफी माघावी अन्यथा त्यांना आमच्या भाषेत उत्तर दिले जाईल असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.

सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार....झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ.

सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) अशा प्रकारे शिवीगाळ का केली? असा सवाल जेव्हा सत्तारांना पत्रकारांनी विचारला तेव्हा सत्तार म्हणाले, "ते आम्हाला खोके बोलत आहेत त्यांचे डोके तपासायला पाहिजेत त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत, त्यांचे डोके तपासावे लागतील. राजकारण हा भिकार धंदा आहे. आम्ही दररोज मतं मागतो, नगरपालिका, पंचायत समित्या, लोकसभा, विधानसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतीदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?

  • राष्ट्रवादीकडून 24 तासांचा अल्टिमेटम

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, "सत्तेचा माज असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार नावाच्या वाह्यात व्यक्तीने सुप्रिया सुळेंबाबत जो अपशब्द वापरलेला आहे, त्यासाठी सत्तार यांनी 24 तासात सुप्रिया सुळे यांची नाक घासून माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. सत्तारांना आम्ही त्यांची लायकी दाखवून देऊ"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT