Devendra Fadnavis  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: वर्षभरात 75 हजार युवकांना सरकारी नोकरी; उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

केंद्र शासनामार्फत पुढील 18 महिन्यात 10 लाख तरुणांना विविध शासकीय विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी राज्यातील युवकांना मोठी घोषणा करून आश्वस्त केले आहे. एक वर्षाच्या कालावधीत राज्यात 75 हजार युवकांना नोकरी देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवली जाईल. असेही त्यांनी म्हटले आहे. नागपूर (Nagpur) येथे दीपोत्सवाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

दीपोत्सवाच्या पर्वावर हा रोजगार मेळावा देशभरातील विविध ठिकाणी आयोजित केला होता. याच कार्यक्रमात नागपूर येथे आज 213 युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. बँक, रेल्वे, पोस्ट, इन्कम टॅक्स यासह केंद्र शासनाच्या विविध जवळपास 38 विभागांमध्ये ही नियुक्ती होणार आहे. आज एकाच दिवशी देशभरात 75 हजार युवकांना नियुक्ती पत्र दिले गेले. केंद्र शासनामार्फत पुढील 18 महिन्यात 10 लाख तरुणांना विविध शासकीय विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे.

"प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रात 10 लक्ष नोकरी भरतीचे लक्ष ठेवले आहे. राज्य शासनालाही अशावेळी मैदानात उतरावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व आपल्या नेतृत्वातील राज्य सरकारची तरुणांना नोकरी देणे ही प्राथमिकता असणार आहे. त्यामुळे वर्षभरात 75 हजार युवकांना सरकारी नोकरी दिली जाईल. त्याची सुरुवात लवकरच 18 हजार युवकांची पोलीस दलामध्ये तसेच 10 हजार युवकांची ग्रामविकास विभागातील भरतीद्वारे केली जाईल," अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्यातील खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्या मोठ्या संख्येने मिळाव्यात. यासाठी नोकरी देणारे व नोकरी हवे असणारे यांचे प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघ निहाय रोजगार मेळावे आयोजित करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

K Vaikunth Goa Postage Stamp: अभिमान! गोव्याचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर के. वैकुंठ यांच्यावरील ‘टपाल तिकीट’ जारी

Viral Video: 56व्या 'IFFI'मध्ये 'पुष्पा'ची क्रेझ! 'मै झुकुंगा नहीं साला' म्हणत एन्ट्री, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

'पूजा नाईकने केलेले आरोप... '! कॅश फॉर जॉब प्रकरणी DGP आलोक कुमारांनी दिली माहिती; हस्तक्षेप टाळण्याचे केले आवाहन Video

Goa ZP Election: प्रियोळ ‘झेडपी’वर ‘मगो’चा वरचष्मा! ढवळीकरांची रणनीती आखायला सुरुवात; गावडेंच्या भूमिकेवर लक्ष

Goa: 'वीज मंत्र्यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे'! मीटरच्या नोटिशीवरुन काँग्रेस आक्रमक; अभियंत्यास घेराव घालून विचारला जाब

SCROLL FOR NEXT