राज्यसभेत यासंदर्भात बोलण्यासाठी मी उराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात 50 टक्क्यांची मर्यादा उठविल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण देणे शक्य आहे का?

छत्रपाती संभाजीराजेंचा सवाल, अपवादात्मक स्थिती आहे का नाही ते राज्य ठरवू शकते. पण घटनेत बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. ते बदल केंद्र सरकारलाच करावे लागतात.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आपल्याला राज्यसभेत बोलण्याची संधी मिळावी यासाठी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. काल संसदेत आरक्षणासाठी आवश्यक घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाले. याबाबत बोलताना छत्रपाती संभाजीराजेंनी 50 टक्क्यांची मर्यादा (50 percent limit) उठविल्याशिवाय महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देणे शक्य आहे का ? (Is it possible to make a reservation?) असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

खासदार संभाजीराजे म्हणाले, अपवादात्मक स्थिती आहे का नाही ते राज्य ठरवू शकते. पण घटनेत बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. ते बदल केंद्र सरकारलाच करावे लागतात. त्यामुळे अशा अपवादात्मक परिस्थितीत केंद्रानेच 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायला हवे.

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. राजर्षी शाहू महाराजांनी 1902 साली पहिले आरक्षण दिले. यामध्ये ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आणि मराठा समाजाचा समावेश यात होता. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटित केले. 2007 पासूनच आम्ही हा लढ लढत आहोत. मराठा समाजाला त्यांचा न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळेच आज राज्यसभेत यासंदर्भात बोलण्यासाठी मी उराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. तेथे मी माझी भूमिका स्पष्ट पणे मांडेन. तेथे बोलण्याची संधी मला मिळेल, असा विश्वास आहे. बोलण्याबाबत मला अद्याप कोणताही निरोप आलेला नाही. असे खासदार संभाजी राजेंनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT