देशात गेल्या काही वर्षात ऑनलाइन स्कॅमच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. व्हॉट्सअॅप हे स्कॅमरचे प्रमुख हत्यार बनले, जिथे ते दररोज हजारो यूजर्संना टार्गेट करत आहेत. स्कॅमर 'स्टेगनोग्राफी' नावाच्या एका खास हॅकिंग तंत्राचा वापर करुन लोकांना टार्गेट करत आहेत. या हॅकिंग तंत्राचा वापर करुन अलीकडेच महाराष्ट्रातील एका व्यक्तीला स्कॅमर्संनी टार्गेट केले. त्याच्या बँक खात्यातून तब्बल 2 लाख लंपास करण्यात आले. चला तर मग हे नेमके प्रकरण काय आहे ते समजून घेऊया आणि त्यानंतर स्टेगनोग्राफी (Steganography) म्हणजे काय हे देखील जाणून घेऊया...
महाराष्ट्रातील एका तरुणाला स्कॅमर्संनी आपला शिकार बनवले. येथील एका 28 वर्षीय तरुणाने अज्ञात नंबरवरुन व्हॉट्सअॅपवर पाठवलेला फोटो डाउनलोड केल्यानंतर त्याच्या बॅक खात्यातून 2 लाखांहून अधिक रुपये गायब झाले. अनोळखी नंबरवरुन डाऊनलोड केलेला फोटो एका वृद्ध व्यक्तीचा दिसत होता. हा गंडा स्कॅमर्संनी स्टेगनोग्राफी नावाच्या विशेष हॅकिंग तंत्राचा वापर घातला.
दरम्यान, या स्कॅमबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, लेस्ट सिग्निफिकंट बिट (LSB) स्टेगनोग्राफी नावाच्या मेथडचा वापर करुन हा गंडा घालण्यात आला. खरंतर, या प्रकारच्या घोटाळ्यात स्कॅमर यूजर्संना खतरनाक कोड, फोटो, ऑडिओ क्लिप किंवा अगदी पीडीएफ सारख्या मीडिया फाइल्स पाठवतात. या स्टेगनोग्राफी फाइल्स अगदी सामान्य दिसतात पण त्यामध्ये मालवेअर लपलेले असतात आणि फाइल उघडताच ते सक्रिय होतात.
63SATS चे व्यवस्थापकीय संचालक नीहर पठारे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, स्टेगनोग्राफी मालिसियस इंस्ट्रक्शंस अंमलात आणण्यासाठी फाइलमधील डेटाच्या सर्वात लहान बिट्समध्ये फेरफार करते. हे केवळ विशेष फॉरेन्सिक साधनांचा वापर करुन शोधले जाऊ शकते. यामुळे यूजर्संना आणि नियमित सेफ्टी सॉफ्टवेअर दोघांनाही धोका ओळखणे कठीण होते.
सायबर सुरक्षा तज्ञ यूजर्संना अशा हल्ल्यांना बळी पडू नये म्हणून काही खबरदारी घेण्याचा सल्ला देतात. यामध्ये अनोळखी नंबरवरुन कोणतीही मीडिया फाइल्स डाउनलोड करणे टाळणे, व्हॉट्सअॅपमधील ऑटो-डाउनलोड फीचर बंद करणे, डिव्हाइसला नवीन सेफ्टी पॅचसह अपडेट ठेवणे आणि कधीही ओटीपी शेअर न करणे समाविष्ट आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.