Pramod Yadav
गोवा सरकारने लॉटरी प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. सरकार लवकरच ऑनलाईन लॉटरी लॉन्च करणार आहे.
येत्या १८ नोव्हेंबर रोजी गोवा सरकारची ऑनलाईन लॉटरी प्रणाली लॉन्च होणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या लॉटरी तिकिट खरेदी करता येणाराय.
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पूर्णपणे पेपरलेस ऑनलाईन लॉटरी सुरु करणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरले आहे.
गोवा सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लॉन्चनंतर २४ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन लॉटरीचा पहिला लकी ड्रॉ काढला जाणार आहे.
आनंदाची बाब म्हणजे या लॉटरीच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या तब्बल ५० कोटी जिंकण्याची संधी आहे.
रिती स्पोर्ट्स आणि दुसाने इन्फोटेक यांच्या वतीने संयुक्तपणे ही लॉटरी चालवली जाणार आहे.