Prisoners  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील 214 कैद्यांची होणार सुटका

महाराष्ट्रा राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगातून 214 दोषींना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Swatantryacha Amrut Mahotsav: महाराष्ट्र सरकार या स्वातंत्र्यदिनी तसेच पुढील प्रजासत्ताक दिनी आणि 2023च्या 15 ऑगस्ट रोजी एकूण 214 दोषींना सोडणणार आहे.अतिरिक्त DG (कारागृह) सुनील रामानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगातून 214 दोषींना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या प्रक्रियेसाठी राज्यपालांच्या औपचारिक आदेशाची प्रतीक्षा आहे. या नियमानुसार दोषींची तीन वेळा सुटका केली जाईल, पहिली 15 ऑगस्ट, दुसरी 26 जानेवारी 2023 आणि तिसरी पुढील वर्षी 15 ऑगस्टला कैद्यांची (Prisoners Release) सुटका केली जाईल.

केंद्र सरकारच्या काही श्रेणीतील कैद्यांना विशेष सवलत देऊन त्यांची तीन टप्प्यांत सुटका करण्याच्या सूचनांनुसार हे आदेश देण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात सुमारे 43,000 अंडरट्रायल आणि 6,000 शिक्षा झालेले गुन्हेगार आहेत.

दरम्यान, 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत, भारत सरकार महिला आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ट्रान्सजेंडर दोषींची शिक्षा कमी करण्याचा विचार करत आहे. मात्र ज्यांचे वर्तन चांगले आहे त्यांना सरकारचा हा आशीर्वाद मिळणार आहे. 60 वर्षांवरील पुरुष कैदी आणि अर्ध्यापक्षा जास्त शिक्षा पूर्ण केलेल्या अपंग कैद्यांनाही सरकार या योजनेचा लाभ देणार आहे.

कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी

2020 च्या अधिकृत अंदाजानुसार, भारतातील तुरुंगांची क्षमता जास्त आहे. देशातील कारागृहांमध्ये 4.03 लाख कैदी ठेवण्याची क्षमता आहे, तर सध्या कारागृहांमध्ये सुमारे 4.78 लाख कैदी असून त्यापैकी सुमारे एक लाख महिला आहेत. गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले आहे की या पात्रता निकषांची पूर्तता करणार्‍या कैद्यांची 15 ऑगस्ट 2022, 26 जानेवारी 2023 आणि 15 ऑगस्ट 2023 रोजी तीन टप्प्यांत सुटका केली जाईल.

स्वातंत्र्याचा अमृतोत्सव म्हणजे काय

भारत यावर्षी 15 ऑगस्ट रोजी आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या तयारीला लागला आहे. भारत सरकार स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हा उत्सव देशातील लोकांना समर्पित आहे. 1858 ते 1947 पर्यंत भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता हे प्रत्येक देशवासीयांना माहीत आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1757 ते 1857 पर्यंत भारतावर राज्य केले.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला 200 वर्षांच्या ब्रिटीश औपनिवेशिक राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यसैनिकाच्या अफाट धैर्याने आणि बलिदानामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले. आजपासून स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अख्खा भारत देश साजरा करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT