Anand Kamble and Mohammad Ahmed Raiza Shaikh arrested Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईत 'चिकन शोरमा' खाल्ल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; स्टॉल चालवणाऱ्या दोघांना अटक

Mumbai: पोलिसांनी शोरमाचे नमुने चाचणीसाठी पाठवले असून स्टॉल मालक आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रयजा शेख यांना अटक केली आहे.

Manish Jadhav

19 Year Old Boy Dies After Eating Chicken Shawarma In Mumbai: मुंबईत चिकन शोरमा खाल्ल्याने एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, ज्यांच्या स्टॉलवरुन या तरुणाने चिकन शोरमा आणून खाल्ला होता. प्रथमेश भोसके असे मृताचे नाव असून त्याने 3 मे रोजी ट्रॉम्बे परिसरातील एका स्टॉलवरुन चिकन शोरमा विकत घेतला होता.

पोलिसांनी शोरमाचे नमुने चाचणीसाठी पाठवले असून स्टॉल मालक आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रायजा शेख यांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, दुकानदाराविरुद्ध भादंवि कलम 304 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपचार करुनही प्रथमेश वाचू शकला नाही

पोलिसांनी (Police) सांगितले की, प्रथमेश भोसके याने 3 मे रोजी चिकन शोरमा खाल्ला होता. 4 मे रोजी त्याला पोटदुखी आणि उलट्या होण्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे प्रथमेशच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात नेले. मात्र त्याची प्रकृती खालावली, त्यामुळे 5 मे रोजी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला केईएम रुग्णालयात नेले.

ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, डॉक्टरांनी प्रथमेशला उपचारानंतर घरी पाठवले होते. पोलिसांनी पुढे सांगितले की, घरी परतल्यानंतर प्रथमेशची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे रविवारी सायंकाळी त्याला पुन्हा केईएम रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन त्याला दाखल केले. मात्र रुग्णालयातच उपचारादरम्यान सोमवारी प्रथमेशचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली

डॉक्टरांना (Doctor) हे प्रकरण संशयास्पद वाटल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 336 आणि 273 अंतर्गत एफआयआर नोंदवला. पोलिसांनी फूड स्टॉल मालक आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रायजा शेख यांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

SCROLL FOR NEXT