महाराष्ट्र

भावंडांसोबत व्हिडिओ तयार करणारा मुंबईचा 17 वर्षीय जगदीश कसे कमावतो लाखो रुपये? वाचा सक्सेस स्टोरी

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.... ही म्हण तुम्ही ऐकली, वाचली असेलच. पण मुंबईतील 17 वर्षीय एका विद्यार्थ्याने या म्हणीला सार्थ रुप दिलयं.

Manish Jadhav

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.... ही म्हण तुम्ही ऐकली, वाचली असेलच. पण मुंबईतील 17 वर्षीय एका विद्यार्थ्याने या म्हणीला सार्थ रुप दिलयं. हा मुलगा मायानगरी मुबंईत आपल्या छोट्याशा फॅमिलीसोबत राहतो. खूप खूश आहे तो आपल्या छोट्याशा फॅमिलीसोबत. त्याचे वडील मुंबईत एक छोटेसे दुकान चालवतात आणि त्याची आई एक गृहिणी आहे. तो आपल्या दोन भाऊ आणि दोन बहिणींसोबत मौजमजा करत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे व्हिडिओ बनवतो. या मुलाचे नाव जगदीश आहे. जगदीश व्हिडिओ बनवून लाखो रुपये कमावतो.

दरम्यान, जगदीशने चार वर्षांपूर्वी आपल्या लहान भावंडांसोबत मौजमजा करत क्रिएटर्स म्हणून प्रवास सुरु केला. आपल्या व्हिडिओमध्ये नाविन्य आणण्यासोबतच ते अधिक मनोरंजक कसे होतील याचा तो सतत विचार करतो. एके दिवशी त्याला दीपेश झो नावाच्या क्रिएटर्ससोबत असताना तो व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) सह आपली कहाणी कशी रंजक बनवतो याचं गमक समजलं. इथूनच जगदीशही आपल्या व्हिडिओमध्ये VFX चा वापर करु लागला, ज्यामुळे त्याचे व्हिडिओ अधिक लोक पसंत करु लागले.

जगदीश त्याचे व्हिडिओ आपल्या वयोगटातील तरुणांसाठी आवडीने बनवतो. तो त्याच्या व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओपेक्षा अधिक नाविन्य कसे आणता येईल याचा सतत विचार करतो. याचबरोबर जोश सारखे प्लॅटफॉर्म जगदीशसारख्या करोडो क्रिएटर्संना एक हक्काचे प्लॅटफॉर्म आहे. जगदीश आपल्या व्हिडिओमध्ये मुलांना निरोगी जीवनशैलीविषयी सांगत असताना तो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा देखील दाखवतो.

जगदीश सांगतो की, "मला तरुण वर्गाला अधिक जागरुक बनवायचे आहे, म्हणून मी असे व्हिडिओ बनवतो." जगदीश व्हिडिओ बनवत असताना कधीही सामाजिक संदेश देण्याचं चुकवत नाही.

आज, जगदीशला जोश प्लॅटफॉर्मवर मोठी फॅन फॉलोइंगसह आहे. नॉन-मेट्रो शहरांमधील 100 दशलक्ष सक्रिय यूजर्स आणि 10 हून अधिक भारतीय प्रादेशिक भाषांमधील सामग्रीसह, जोश जगदीश सारख्या क्रिएटर्संसाठी एक हक्काचे प्लॅटफॉर्म आहे.

जगदीशचे भविष्यातील प्लॅन ठरलेले आहेत. त्याला व्हिडिओ बनवत राहायचे आहे आणि त्याच्या आवडत्या YouTubers प्रमाणे इतरांना प्रेरित करायचे आहे जे त्याला प्रेरणा देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT