17 Deaths Occurred In Hospital at Kalwa In Thane In 12 Hours. Dainik Gomantak
महाराष्ट्र

Thane: ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 12 तासांत 17 रुग्णांचा मृत्यू

Thane: ठाण्यातील कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल (12 ऑगस्ट) रात्री 10 ते आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत सुमारे 17 मृत्यू झाले आहेत.

Ashutosh Masgaunde

17 Deaths Occurred In Hospital at Kalwa In Thane In 12 Hours:

रविवारी सकाळी महाराष्ट्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (CSMH) अवघ्या 12 तासांच्या सुमारे 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल (12 ऑगस्ट) रात्री 10 ते आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत सुमारे 17 मृत्यू झाले आहेत.

रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर म्हणाले, "मृत्यू झालेले सर्व रुग्ण अत्यंत गंभीर होते, तसेच त्यांना खाजगी रुग्णालयाने शेवटच्या टप्प्यात आमच्याकडे दाखल करण्याचा सल्ला दिला होता."

तसेच, 3-4 रुग्ण 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. मी अजूनपर्यंत सर्व माहिती गोळा करत आहे. त्यामुळे 17 मृत्यू झाले की नाही हे त्यानंतरच सांगू शकेल असे माळगावकर म्हणाले.

ठाणे शहरातील कळव्यात ही दुर्घटना घडली आहे. विशेष म्हणजे ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे मूळ गाव आहे. हे रुग्णालय स्वतः ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत चालते, तेथे गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे.

माजी महापौर आणि शिवसेना (Shivsena) नेते नरेश म्हस्के म्हणाले की, मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधला आहे. आम्ही महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत.

अधिकार्‍यांनी सांगितले की ते रुग्णांच्या मृत्यूची कारणे काय आहेत याचा शोध घेत आहेत. यामधील अनेक रुग्ण वृद्ध असून त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हे रुग्णालय शहरातील एकमेव तृतीय श्रेणी रुग्णालय आहे आणि येथे रुग्णांची मोठी गर्दी असते. विशेषत: उपनगरातील आणि अगदी शेजारील जिल्ह्यांमधून उपचारासाठी इथे येत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT