महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

भाजपचे 'या' 12 आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन

ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर एम्पिरिकल डाटा राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, असा ठराव राज्य सरकारतर्फे मांडण्यात आला यावेळी विरोधक व सत्ताधारी यांच्यात चांगलाच संघर्ष झाला.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon convention) पहिला दिवस वादळी ठरला आहे. विधानभवनात केलेल्या गैरवर्तनाबद्दल महाराष्ट्र विधीमंडळातून भाजपच्या (BJP) १२ आमदारांचे (MLA) १ वर्षासाठी विधानभवनातून निलंबन (Suspension) झाले आहे.

कोण आहेत ते बारा आमदार

संजय कुटे, राम सातपुते, अतुल भातखाळकर, अभिमन्यू पवार, जायकुमार रावळ, नारायण कुचे, गिरीश महाजन, आशीष शेलार, पराग आळवणी,योगेश सागर, कितरिकूमार भांगडिया, हरिष पिंपळे

दरम्यान, केंद्र सरकारने ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर एम्पिरिकल डाटा राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, असा ठराव या अधिवेशनादरम्यान राज्य सरकारतर्फे मांडण्यात आला होता.

हा ठराव मंजूर करण्यावरून विरोधक व सत्ताधारी यांच्यात चांगलाच संघर्ष झाला आणि . या प्रकरणात विरोध करत असताना विरोधी पक्षाच्या काही आमदारांनी सभागृहात धक्काबुक्की केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे. तसेच विरोध करत असताना काही आमदारांनी अध्यक्षांचा माई कही ओढला आणि त्याचेच पडसाद आता उमटायला सुरवात झाली आहे.

या प्रकरणात भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षांसाठी निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षाकडून जोरदार हल्ला केला गेला. ही फक्त एक कहानी रचून केलेली कारवाई आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT