Live Updates

Today's Live Updates Goa: शव प्रदर्शन सोहळा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बनणार आहे: मुख्यमंत्री

Latest Marathi News: राज्यात दिवसभर घडणाऱ्या ताज्या घडामोडींच्या अपडेट्स.

Akshata Chhatre

शव प्रदर्शन सोहळा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बनणार आहे: मुख्यमंत्री

गोव्यात 21 नोव्हेंबर ते 5 जानेवारी दरम्यान सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा शव प्रदर्शन सोहळा आयोजित केले जाईल. शव प्रदर्शनासाठी ओल्ड गोवा येथे बस वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि 27 डिसेंबर रोजी विशेष कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना सुरक्षा बाळगण्याचा इशारा

राज्यात सध्या नोकरी घोटाळा, मानवी तस्करी, लूट सारख्या प्रकारांचा धुमाकूळ सुरु आहे म्हणूनच सामान्य लोकांनी सावध राहणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

"कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात सरकारने कडक कारवाई करणे आवश्यक"

"सरकारी नोकरी फसवणूक प्रकरणात कोणतरी गैरफायदा घेत आहे, मात्र राज्यातील युवा वर्गावर याचा परिणाम होत असून, लवकरच या प्रकरणांवर आळा घालणे गरजेचे आहे." सरकारने सखोल व कडक कारवाई करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केले.

'कॅश फॉर जॉब' स्कॅम' प्रकरणातील दीपश्रीचा साथीदार पोलिसांच्या तावडीत

सरकारी नोकरी प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या दीपाश्री सावंत हीच साथीदार अनिकेत कांदोळकर (27, माशेल) याला सोमवारी (दि. 18 नोव्हेंबर) रोजी रात्री म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली.

अखेर त्या महिलेचा मृतदेह सापडला!

सावर्डे सत्तरी येथे रेती उत्खनन करत असताना म्हादई नदी पात्रात बुडालेल्या सुवर्णा गावकर या महिलेचा मृतदेह अखेर सापडला. अग्निशामक दल व स्थानिकांकडून दोन दिवसांपासून शोध सुरू होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Exposition: 46 दिवसांचा वाहतूक आराखडा तयार; जाणून घ्या सर्व पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्था

IFFI 2024: Golden Peacock साठी 7 चित्रपटांत चुरस! पदार्पणातील पारितोषिकासाठी 2 Indian Films स्पर्धेत..

Goa Opinion: केवळ मुसलमान म्हणून विरोध?

Priya Yadav Case: 'प्रिया'चे Cash For Job कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत? ‘ते’ रेल्वे अधिकारी कोण? रोज नवीन भानगडी उघडकीस

Goa App: 8.43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याची संधी हुकली; गोव्याचा उद्योग अमेरिकेत Tim Draper च्या शोमध्ये झळकला पण...

SCROLL FOR NEXT