Priya Yadav Cash For Job Scam
डिचोली: फसवणूकप्रकरणी सध्या पोलिस कोठडीची हवा खात असलेल्या प्रिया यादव हिने वेगवेगळी ‘शक्कल’ वापरून महिलांना गंडा घातला आहे, अशी माहिती समोर येत आहे. प्रिया हिच्या फसवणूक प्रकरणाची पाळेमुळे महाराष्ट्रापर्यंत गेली असावीत, असा संशय असून, त्या दिशेने पोलिस तपास सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
आमिषाला बळी पडलेल्या डिचोलीतील एका महिलेकडे प्रिया यादव हिने चार व्यक्तींना आणले होते. ते सर्व महाराष्ट्रातील रेल्वेचे अधिकारी असल्याचे प्रियाने संबंधित महिलेला सांगितले होते. रेल्वेत नोकरीचे पक्के झाले आहे.
असे अधिकारी म्हणून ओळख केलेल्या संबंधित व्यक्तींकडून पीडित महिलेला सांगण्यात आले होते, अशी माहिती आमिषाला बळी पडलेल्या एका महिलेने उघड केली आहे.
अधिकारी म्हणून आलेल्या व्यक्ती रेल्वेशी संबंधित आहेत, की बोगस अधिकारी होते. ते तपासानंतर स्पष्ट होणार आहे. अधिकारी बनून आलेल्या ‘त्या’ व्यक्ती भाडोत्री असाव्यात, असा कयास आहे. तूर्तास प्रिया यादव फसवणूक प्रकरणात नवीन भानगडी पुढे येत आहेत.
मास्टरमाईंड पोलिस कॉन्स्टेबलनंतर या फसवणूक प्रकरणात आणखी काहीजण अडकण्याची शक्यता आहे. पोलिसही त्यादृष्टीने तपास करीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. प्रिया यादवला सहकार्य करणारा मास्टरमाईंड पोलिस कॉन्स्टेबल रोहन वेंझी याला यापूर्वीच निलंबित व्हावे लागले आहे. दरम्यान, प्रिया यादव हिच्याविरोधात फसवणूक प्रकरणात आणखी गुन्हे नोंद होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.