५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ५ परदेशी आणि २ भारतीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी दिल्या जाणाऱ्या पारितोषिकासाठी स्पर्धा करणार आहेत.
चांगल्या जीवनाच्या शोधात असलेल्या दोन विस्थापित, निर्वासित चुलत भावंडांमध्ये घडणारे हे एक प्रसंगनिष्ठ रोमांच नाट्य आहे. महदी फ्लेफॅल हे सामाजिक न्याय आणि निर्वासितांच्या समस्या यांचा वेध आपल्या कलाकृतीमधून मांडण्याविषयी ओळखले जातात.
पर्यावरण शास्त्र, सामुदायिक जीवन आणि लैंगिक वेगळेपणा या गुंतागुंतीच्या विषयावर आधारलेला हा चित्रपट ब्राझीलचा पारंपरिक वारसा काव्यात्मकपणे मांडतो. हा चित्रपट ब्राझीलच्या सामाजिक नेत्या मारिया डो सेल्सो यांच्या जीवनावरून प्रेरित आहे.
२८ वर्षीय गृहिणी सरस्वती, तिचा बस कंडक्टर नवरा आणि तिची दोन मुले यांची ही गोष्ट आहे. आपल्या मुलाला गणितात मदत करण्याच्या निर्धाराने कमी शिक्षण झालेली सरस्वती स्वतः गणित शिकू लागते.
अंतर्गत कलह, कुटुंबातील वैर, दुसऱ्या शेतकऱ्याशी शत्रुत्व अशा अनेक आघाड्यांवर संघर्ष करणाऱ्या एका आयरिश मेंढपाळ कुटुंबाभोवती हा चित्रपट फिरतो. आयर्लंडच्या सांस्कृतिक आयामातून पितृत्व, वारसा आणि पिढीजात आघात या चक्रांवर हा चित्रपट प्रकाश टाकतो.
हिंसाचारात अडकलेली एक स्त्री, गंभीर आजाराने ग्रस्त असलेला एक माणूस आणि प्रारंभीच्या चकमकीनंतर एकमेकात गुंतलेले दोन एकाकी आत्मे यासंबंधीचा हा चित्रपट आहे. प्रसिद्ध चिनी पटकथा लेखक हुवो क्षीन यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे.
भूक, विस्थापन, टंचाई या विषयाचा वेध घेणारे एक मार्मिक नाट्य आहे. गरोदर मातेला रोज भीक मागून शिळे अन्न तिला खावे लागत असते. एकदा तिचा लहान मुलगा ताज्या गरम अन्नाच्या वासाने मंत्रमुग्ध होतो आणि त्या पदार्थाचा तो सुवास त्यांना त्यांचे जीवन बदलण्याची संधी देतो.
हा चित्रपट वयस्करांची कहाणी मांडतो. इतरांच्या सहाय्याने जीवन घालवत असलेल्या एका वृद्ध स्त्रीच्या संक्रमणाच्या या कथेत ती आपली दोलायमान स्मृती, वयाची ओळख, आपल्या इच्छा याच्या अनुषंगाने स्वतःशी आणि केअरटेकरशी परस्परविरोधी नातेसंबंधातून वाद घालत असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.