St. Xavier Exposition: 46 दिवसांचा वाहतूक आराखडा तयार; जाणून घ्या सर्व पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्था

Traffic Plan For Old Goa Exposition: स्थानिकांना त्रास होऊ नये तसेच यात्रेकरूंना वेळेत आणि व्यवस्थित चर्चपर्यंत पोहोचता यावं म्हणून समिती आणि सरकारने वाहतुकीचा एक आराखडा बनवला आहे
Traffic Plan For Old Goa Exposition:  स्थानिकांना त्रास होऊ नये तसेच यात्रेकरूंना वेळेत आणि व्यवस्थित चर्चपर्यंत पोहोचता यावं म्हणून समिती आणि सरकारने वाहतुकीचा एक आराखडा बनवला आहे
Traffic Plan For Old Goa ExpositionDainik Gomantak
Published on
Updated on

ओल्ड गोवा: राज्यात बुधवार 20 नोव्हेंबर पासून सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे. 10 वर्षांनंतर होणार हा अनोखा सोहळा देश विदेशातील भाविकांसाठी महत्वाचा ठरणार आहे. 20 नोव्हेंबर ते 5 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यासाठी खास वाहतूक योजना करण्यात आलीये.

स्थानिकांना वाहतुकीचा काही त्रास होऊ नये तसेच यात्रेकरूंना वेळेत आणि व्यवस्थित चर्चपर्यंत पोहोचता यावं म्हणून समिती आणि सरकारने वाहतुकीचा एक आराखडा बनवला आहे.

परिवहन मंडळाच्या आराखड्यानुसार फोंडा आणि मडगाव येथून एक्सपोजीशनच्या शटल बसेसचा वापर करणारे यात्रेकरू माजी आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या घराजवळ उतरतील आणि इथून त्यांना दोन मुख्य गंतव्यस्थानांकडे निर्देशित केले जाईल, पैकी एक आहे एला फार्म आणि दुसरे आहे पिंटो गॅरेज. पिंटो गॅरेज मार्गे जाणारी बसेस जुन्या गोव्यातील पंचायतीजवळ एक थांब घेतील. 

Traffic Plan For Old Goa Exposition:  स्थानिकांना त्रास होऊ नये तसेच यात्रेकरूंना वेळेत आणि व्यवस्थित चर्चपर्यंत पोहोचता यावं म्हणून समिती आणि सरकारने वाहतुकीचा एक आराखडा बनवला आहे
St. Francis Xavier Exposition: शवप्रदर्शनासाठी यात्रेकरूंना शटल बससेवा, ४६ दिवसांचा वाहतूक आराखडा तयार; केवळ मुख्यमंत्र्यांची संमती बाकी

शवप्रदर्शनाच्यावेळी खासगी वाहनाच्या वापरावर निर्बंध असल्याने खासगी वाहन चालकांना गाडी पार्क करण्यासाठी ठराविक जागा देण्यात आल्या आहेत आणि इथून पुढे चर्चसाठी ते शटल बसचा वापर करू शकतात.

धेम्पो शिपयार्डजवळील भाकीया प्रॉपर्टी, ओल्ड गोवा एज्युकेशन सोसायटी शाळेचे मैदान माँटफोर्ड ग्राउंड आणि हेलिपॅड अशा स्थानकांचा वापर पार्किंगसाठी करण्यात येणार आहे.

प्रवाशांना पणजीहून जुन्या गोव्याला नेण्यासाठी खास बसेस आखून दिल्या आहेत, यामध्ये रायबंदर फेरीचा समावेश होतो. पणजीहून रायबंदरमार्गे जुन्या गोव्याला जाणाऱ्या या बसेस धेम्पो इंजिनियरिंग कॉलेजकडून डाव्या बाजूला वळतील आणि भाकीया प्रॉपर्टीवर पोहोचतील.

दुचाकी तसेच चारचाकी गाड्या घेऊन पणजीहून जुन्या गोव्यात येणाऱ्यांसाठी देखील भाकीया प्रॉपर्टीवर गाडी पार्क करणं महत्वाचं आहे. दिव्यांग तसेच इतर आजार असलेल्या भाविकांसाठी जुन्या गोव्यातील पंचायतीजवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जुन्या गोव्याहून पुन्हा पणजीला जाताना या गाड्या ऑगस्टीन टॉवरच्या रस्त्याने रायबंदरला जातील.

पणजीहून फोंडामार्गे जुन्या गोव्याला जाणाऱ्या बसेस रायबंदरचा रास्ता पकडणार नाहीत. या बसेस कदंबा बायपास रस्त्याचा (NH-748) वापर करतील. या रस्त्याने येणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था माजी आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या घराजवळ करण्यात आली आहे. तसेच ऑगस्टीन टॉवरकडून येणाऱ्या गाड्या भाकीया प्रॉपर्टीवर गाडी पार्क करू शकणार आहेत.

सोहळ्याच्या उद्घाटना दिवशी तसेच समारोपासह फेस्ताच्या दिवशी अवजड वाहनांना NH-748 वर वळवण्यात येणार आहे. दरम्यान जुन्या गोव्याहून जाणाऱ्या अवजड वाहनांना NH-66 आणि NH-748 वर वळवण्यात येणार आहेत.

दक्षिण गोव्याहून येणाऱ्या गाड्यांना एला फार्म आणि पशुसंवर्धन केंद्राच्या आवारात जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दक्षिण गोव्याहून येणाऱ्या बसेस कुंकळकर शाळेच्या मैदावरून NH-748 चा रास्ता पकडणार आहेत. फोंडयाच्या मार्गाने येणाऱ्या गाड्या पिंटो गॅरेजकडून डाव्या बाजूला वळतील आणि मागच्या बाजूला उपलब्ध जागेत गाड्या पार्क करतील. यामार्गाने येणाऱ्या बसेस मात्र मडकईकर प्लाझाकडून उजव्या बाजूने वळत हबर्ड चिकन फार्म इथे गाड्या पार्क करणार आहेत.

Traffic Plan For Old Goa Exposition:  स्थानिकांना त्रास होऊ नये तसेच यात्रेकरूंना वेळेत आणि व्यवस्थित चर्चपर्यंत पोहोचता यावं म्हणून समिती आणि सरकारने वाहतुकीचा एक आराखडा बनवला आहे
St. Francis Xavier Exposition: एक्सपोजीशन सोहळ्यावर गोवा पोलिसांची करडी नजर; सुरक्षेसाठी १,५०० पोलीस कर्मचारी तैनात

फोंड्याहून पणजीला जाणाऱ्या कुठल्याही गाड्यांना जुन्या गोव्याहून जाता येणार नाही त्यांना NH-748 चा वापर करावा लागेल. फोंड्याच्या बाजूने येणाऱ्या अवजड वाहनांना NH-66चा वापर करावा लागणार आहे.

दिवाडीहून जुन्या गोव्याला येणाऱ्या गाड्यांसाठी सेंट कॅजेटन चर्चच्या मैदानावर गाड्या पार्क करण्याची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच दिवाडीहून पणजी किंवा फोंड्याला जाणारी वाहनं व्हाईसरॉयच्या आर्च आणि आर्च ऑफ कन्सेप्शनमार्गे जातील.

शव प्रदर्शनाच्यावेळी ओल्ड गोवा चर्च जंक्शन ते गांधी सर्कल हा रास्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल, केवळ रुग्णवाहिका तसेच पोलिसांच्या गाड्यांसाठी हा मार्ग वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच जुन्या गोव्यातील रिंगरोडचे रूपांतर एकेरी वाहतूक मार्गात करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com