Crime theft Canva
Live Updates

Goa News: सत्तरीत घरात घुसून चाकू हल्लाकरत ऐवज लुटला; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Marathi Breaking News 07 July 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

मोकाट गुरांच्या गळ्यात 'रिफ्लेक्टिव्ह पट्टे'

मोकाट गुरांच्या गळ्यात 'रिफ्लेक्टिव्ह पट्टे'. रस्त्यावरील अपघात निष्पाप बळी टाळण्यासाठी 'वेदांता'चा अभिनव उपक्रम

मोठा गुंतवणूक घोटाळा उघडकीस; एकाला अटक

सायबर क्राईम पोलिस स्टेशन रायबंदर गोवाने २.४५ कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याचा मोठा गुन्हा उघडकीस आणला. "नुवामा वेल्थ अँड इन्व्हेस्टमेंट" चे दलाल असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यांनी साष्टी येथील एका रहिवाशाला व्हॉट्सअॅपद्वारे बनावट शेअर बाजार योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते, उच्च परताव्याच्या खोट्या आश्वासनावर. आर्थिक चौकशी दरम्यान, आरोपी संजय एम चव्हाण (४५ महाराष्ट्र) याला पीडितेकडून १३.५ लाख रुपये त्याच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचे आढळून आल्यानंतर अटक करण्यात आली. आणखी संशयितांचा शोध आणि अटक अद्याप बाकी आहे. तपास सुरू आहे.

आमचो आवाज अंतर्गत तालुका जनता दरबार फोंडा येथे विठोबा मंदिरच्या सभागृहात

आमचो आवाज,विजयच्या अंतर्गत तालुका जनता दरबार फोंडा येथे विठोबा मंदिरच्या सभागृहात दि.९ जुलै रोजी सकाळी १० वाजता. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई राहणार उपस्थित - दुर्गादास कामत

माशेल येथे पारंपरिक चिखल काल्याला हजारोंची गर्दी

भाजपकडून आदिवासींवर जर अन्याय, तर मग भाजपची साथ सोडणार का? प्रकाश वेळीपांचे तळ्यात-मळ्यात उत्तर

गोमंतक गौड मराठा समाज आणि उटावरील बंदी म्हणजे भाजप सरकारकडून आदिवासींवर आणखीन एक मोठा अन्याय. ह्यामागे कटकारस्थान. गोविंद गावडे समर्थक माजी मंत्री प्रकाश वेळीपांचो आरोप. आदिवासींवर सरकारकडून एवढा अन्याय होत असेल तर मग भाजमधून बाहेर पडणार का? ह्या पत्रकारांच्या प्रश्नावर 'समाज संघटना वेगळी आणि पक्ष वेगळा. येणारा काळ काय ते ठरवेल' असे स्मीतहास्य करत प्रकाश वेळीपांचे तळ्यात-मळ्यात उत्तर.

गोमंतक गौड मराठा समाज आणि उटावरील बंदी हटवा,अन्यथा...

सरकारने लवकरात लवकर गोमंतक गौड मराठा समाज आणि उटावरील बंदी हटवावी. ही बंदी लागू केल्यामुळे आदिवासींना एसटी जातप्रमाणपत्र मिळणे झाले आहे बंद. जर बंदी हटवली नाही तर 2027च्या विधानसभा निवडणूकीत मते मागण्यासाठी येणाऱ्या भाजपला जाप विचारु. आम्ही गावागावत, वाड्यावाड्यावर जाऊन लोकांना जागृत करू. गोविंद गावडे समर्थक विश्वास गावडे, माजी मंत्री प्रकाश वेळीप, दुर्गादास गावडे व अन्य नेत्यांचा सरकारला पुन्हा इशारा

त्या दोन मुली महाराष्ट्र-नाशिक येथे सापडल्या

कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतीतून अपहरण झालेल्या त्या दोन मुली महाराष्ट्र-नाशिक येथे सापडल्या. त्यांच्या अपहरणप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मांद्रे मधलामाज पुलाजवळ मागच्या तीन दिवसापासून जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

मांद्रे मधलामाज पुल जवळ मागच्या तीन दिवसापासून जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया ,शिवाय गटार व्यवस्था कोलमडल्याने या रस्त्यावर पाणी असे साचून राहते ,त्यात भर पडली ती जलवाहिनी फुटून पाणी वाया जाण्या

सत्तरीत घरात घुसून, चाकू हल्लाकरत ऐवज लुटला

सालेली,सत्तरीत भरदिवसा घरात घुसून महिलेवर चाकूचा वार करत दोन अडीच लाखांचा ऐवज लंपास. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळवारचा दिवस महाशुभयोगाचा! 'या' 5 भाग्यवान राशींवर राहणार बजरंगबलीची कृपादृष्टी, धनालाभासह मिळणार नशिबाचीही साथ

Viral Video: धावत्या ट्रेनला लटकून स्टंटबाजी! 'हीरो' बनणाऱ्या पठ्ठ्याची मोडली खोड; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 'बरं झालं...'

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

AUS vs SA: टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पुन्हा रचणार इतिहास! 'या' एलिट खेळाडूंच्या यादीत होणार सामील; घ्याव्या लागणार फक्त 'इतक्या' विकेट्स

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

SCROLL FOR NEXT