शनिवारी हरमल येथे ऑनलाइन राईड बुक करणाऱ्या एका ग्राहकाला घेण्यासाठी गोवा माइल्स टॅक्सी चालक गेला तेव्हा त्याला धमकावण्यात आले आणि शिवीगाळ करण्यात आली.
पाऊस शेतकऱ्यांसाठी जरी जीवनदायी असला तरी अतिवृष्टीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागते. ताळगाव येथील शेतकऱ्यांनी सांगितले की यावर्षी झालेल्या जास्त पावसामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.मध्ये मध्ये पडणाऱ्या पावसामुळे आमच्या पिकांची नासधूस झाली असे त्यांनी सांगितले.
मर्सेसमधील विशेष न्यायालयाने रमा कानकोणकर हल्ला प्रकरणातील आरोपी जेनिटो कार्डोझोचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
मोटारसायकलची धडक बसून तीन वर्षीय मुलगा गंभीर जखमी. डिचोलीतील मुस्लिमवाडा येथे अपघात. मूळ झांशी येथील जखमी मुलगा मजूर कुटुंबातील
मडगाव जेएमएफसीने मुंगुल हल्ला प्रकरणात अटक केलेल्या २६ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली. पुढील सुनावणी १ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल.
चांदेल हसापूर पंचायत क्षेत्रात दिवाळीसाठी खास महिला ग्रुप महिलांचा बाजार भरवण्यात आला. त्यामध्ये विविध खाद्यपदार्थ याचे उद्घाटन आमदार प्रवीण आर्लेकर सरपंच बाळा शेटकर आदी उपस्थित होते.
जेनिटो कार्डोझोसह रमा काणकोणकर हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जेनिटो कार्डोझो जामिनाचा आदेश आज दुपारी ४.३० वाजता येईल.
आणखी दोन दिवसांत दिवाळी सण येणार असल्याने खरेदीसाठी पणजी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. आकाशकंदीलांचे दर मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत ३०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत.दुकानदारांच्या म्हणण्यानुसार बाजारात बाहेरील राज्यांतील दुकाने मोठ्या प्रमाणात उभी राहिल्यामुळे स्थानिक गोमंतकीय दुकानदारांचे गिऱ्हाईक कमी झाले आहे.गेल्या २५ ते ५० वर्षांपासून व्यवसाय करणारे काही जुने दुकानदार सांगतात की मागील काही वर्षांप्रमाणे आता धंदा होत नाही, कारण बाहेरचे व्यापारी येऊन व्यवसाय करतात आणि त्यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
थंड पेयाच्या सीलबंद बाटलीत मिरची पूड आढळून आली, बाटलीत मिरची पूडची पाकिट सापडल्याने खळबळ निर्माण झाली. फोंड्यातील या घटनेवरुन स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
रासई-लोटली येथे विजय मरीन शिपयार्डमध्ये जहाज बांधणीचे काम सुरू असताना अचानक आग लागून मोठा स्फोट झाल्याने दोघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य चार कामगार जखमी झाले. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी सुरक्षा अधिकाऱ्याला अटक केली आहे. या दुर्घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बांबोळीत हिट अँड रन प्रकरणात १४ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोलवा येथे भाडेकरु रुमच्या बाहेर ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खबबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल तपास सुरु केला. रात्री आलेल्या वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटात व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.