Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Rama Kankonkar attack case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात महत्त्वाचा आरोपी असलेल्या जेनिटो कार्दोझचा जामीन अर्ज मेरशी येथील विशेष न्यायालयाने फेटाळला.
Rama Kankonkar Attack
Rama Kankonkar AttackDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात महत्त्वाचा आरोपी असलेल्या जेनिटो कार्दोझचा जामीन अर्ज शनिवारी (१८ ऑक्टोबर) मेरशी येथील विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.

या प्रकरणात जेनिटो कार्दोझसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून, सर्व संशयितांना ३१ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली गेली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी कोणत्याही आरोपीला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

Rama Kankonkar Attack
Goa Shipyard Blast: लोटली येथे शिपयार्डमध्ये आगीमुळे मोठा स्फोट; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू; 4 जखमी

शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान झेनिटो कार्दोझच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. बचाव पक्षाने असा दावा केला की, पोलिसांनी अटकेचे कारण स्पष्टपणे दिलेले नाही. “अटकेचा हेतू म्हणजे अटक का आवश्यक आहे हे स्पष्ट करणे गरजेचे असते; मात्र या प्रकरणात तो हेतू सांगितलेलाच नाही,” असा युक्तिवाद वकिलांनी मांडला.

कार्दोझच्या वकिलांनी पुढे सांगितले की, “झेनिटो कार्दोझवर मोबाईल फोन फॉरमॅट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या कृतीसंदर्भात भारतीय न्याय संहिता कलम २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो जामिनपात्र गुन्हा आहे.” मात्र या सर्व बाबींवरही न्यायालयाने सरकारी बाजू मान्य केली नाही.

Rama Kankonkar Attack
Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

झेनिटोच्या वकिलांनी त्याच्या अटकेला पूर्णपणे बेकायदेशीर ठरवून, “या गुन्ह्याशी त्याचा कोणताही संबंध नाही,” असा दावा केला. परंतु आता न्यायालयाने झेनिटो कार्दोझचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com