Goa Marathi Breaking News Dainik Gomantak
Live Updates

Goa News Live: केरी सत्तरी येसरपंचपदी नंदिता गावस यांची बिनविरोध निवड

Goa Today's News Live Updates: गोव्यात विविध क्षेत्रात दिवसभर घडणाऱ्या ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

केरी सत्तरी येसरपंचपदी नंदिता गावस यांची बिनविरोध निवड

केरी सत्तरी येथील पंचायतीचा सरपंचपदी नंदिता गावस यांची बिनविरोध निवड, काही दिवसापूर्वी माजी सरपंच सुप्रिया गावस यांच्यावर पंचायत मंडळाने अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर सरपंचपण रिक्त होते, त्यानुसार सरपंचपदाची निवडणूक झाली.

पणजी विजयदुर्ग बससेवा सुरू

तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर कदंब वाहतूक महामंडळाने पणजी ते विजयदुर्ग अशी दैनंदिन बससेवा पुन्हा सुरू केली आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

पाच दिवस तुरळक पावसाची शक्यता

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाची तीव्रता मंदावली आहे. मागील २४ तासांत राज्यात सरासरी १५.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पुढील पाच दिवस राज्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. सर्वसामान्यपणे जून ते सप्टेंबर हा मान्सून कालावधी मानला जातो. तो संपुष्टात आल्यानंतर आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे आता पावसाची तीव्रता मंदावली आहे.

राज्यात नवा कामगार कायदा अंमलात

गोवा सरकारने गोवा दुकाने व आस्थापना (रोजगाराचे नियमन व सेवा अटी) अधिनियम, २०२५ (गोवा अधिनियम क्र. २३, २०२५) लागू केला आहे. यामुळे राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे, दुकाने व विविध व्यावसायिक आस्थापनांवर लागू असलेला १९७३ चा कायदा रद्द झाला आहे.

ओपा पाण्याच्या वाहिनीत बिघाड, पणजीत मर्यादीत पाणी पुरवठा

ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याची वाहिनी जोडणीवर तुटल्याने पणजी भागात पाणी पुरवठा मर्यादित. दुरुस्तीचे काम संध्याकाळ पर्यंत होण्याची शक्यता. सर्व अभियंते घटनास्थळी.

अनमोड राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मारुती व्हॅनमध्ये भीषण अपघात

अनमोड राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मारुती व्हॅनमध्ये भीषण अपघात. मारुती व्हॅन चक्काचूर तर अपघाती ट्रक कोसळला खोल दरीत. ट्रक चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुळे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. गुरुवारी उशीरा रात्री ही घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajinkya Rahane: "टीम इंडियाला माझी गरज..." 159 धावांच्या धडाकेबाज खेळीनंतर अजिंक्य रहाणेने निवडकर्त्यांवर साधला निशाणा!

Abbakka Devi History: पोर्तुगिजांनी युद्धाच्या आधी सैन्याचे तंबू पेटवून दिले, 'राणी अब्बक्का'ने अग्निबाण वापरला; अज्ञात इतिहास

Double Hat-Trick: अविश्वसनीय! एकाच डावात दोन गोलंदाजांनी घेतली हॅट्रिक, डबल हॅट्रिक घेणारे 'ते' दोन गोलंदाज कोण? Watch Video

Viral Video: देसी 'सीटी स्कॅन' मशीनचा भन्नाट जुगाड व्हायरल, डॉक्टर आणि रुग्ण बनून तरुणाईची कमाल; नेटकरी म्हणाले...

Horoscope: उत्तम आरोग्याचे संकेत! 'या' 3 राशींच्या लाईफस्टाईलमध्ये होणार लक्षणीय सुधारणा, जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT