Goa Live Updates Dainik Gomantak
Live Updates

Goa News: २० वर्षीय मुलगा वसतिगृहाच्या खोलीत मृत आढळला

Goa Marathi Breaking News 16 August 2025: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घटना.राजकारण, मनोरंजन, क्रीडा, हवामानाचा अंदाज आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Sameer Panditrao

Krishna Janmashtami: गोपाळकाल्याच्या सर्वांना शुभेच्छा!

Mungul Gang War:  मुंगुल हल्ला प्रकरण, आणखी ३ आरोपींना अटक

मुंगुल हल्ला प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी कर्नाटकातून ३ आरोपींना अटक केली आहे. प्राणघातक हल्ल्यानंतर हे तिघेही फरार होते, आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

सावर्डे मतदार संघात भाजप तिकीटसाठी आपणांसह अनेकजण इच्छुक, तेंडुलकर

सावर्डे मतदार संघात भाजप तिकीटसाठी आपणांसह अनेकजण इच्छुक. पण पक्षाचा निर्णय सर्वाना मान्य करावा लागणार असे प्रतिपादन माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी केले आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतिदिन

भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतिदिन आहे.

'गोविंदा रे गोपाळा..!'. डिचोलीतील विविध शाळांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

डिचोलीतील विविध शाळांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी. 'गोविंदा रे गोपाळा'च्या जल्लोषात दहीहंडी फोडली.

Yellapur: येल्लापूरमध्ये केएसआरटीसी बसची ट्रकला धडक, तीन जणांचा मृत्यू

बागलकोटहून मंगळुरूला जाणाऱ्या केएसआरटीसी बसने येल्लापूर येथे पार्क केलेल्या लॉरीला धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दोन मुलांचा समावेश आहे, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी भारतीय संघ 19 ऑगस्ट रोजी होणार जाहीर

अजित अगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती मंगळवार (१९ ऑगस्ट) रोजी भारताच्या आशिया कप संघाची घोषणा करणार.

आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली

दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची गोवा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी भेट घेतली. या भेटीत गोव्यातील खारफुटी संवर्धन, ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत पाच लाख वृक्ष लागवड आणि इको-टुरिझम वाढवण्यावर चर्चा झाली.

Mungul: मुंगुल प्रकरण, आणखी 2 आरोपींना अटक

मुंगुल हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दीपक कट्टीमणी आणि परशुराम राठोड या आणखी दोन आरोपींना अटक केली. हल्ल्यासाठी वापरलेला हातोडा, तलवार आणि कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केला.

नाणूस येथील सभागृहाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

नाणूस वाळपई येथील जय श्रीराम गोसवर्धन केंद्रात नवीन उभारलेल्या सभागृहाचे गोकुळाष्टमीच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचा हस्ते उद्घाटन झाले.

Goa Monsoon: गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी

गोव्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD Goa) दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट आणि १८ ऑगस्ट रोजी राज्यभर “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला आहे.

Dahi Handi: नागेशीत 'गोविंदा रे गोपाळा'च्या गजरात दही हंडी साजरी

नागेशीत 'गोविंदा रे गोपाळा'च्या गजरात दही हंडी साजरी, सार्वजनिक भजनी सप्ताहाची दही हंडीने सांगता झाली.

Gokulashtami: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

गोकुळाष्टमीच्या गोपाळकाला निमित्त नाणुस-वाळपई येथील जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोमातेची पूजन विधी पार पडली. या प्रसंगी मुख्यमंत्री सावंत यांनी पारंपरिक पद्धतीने गोमातेची पूजा करून धार्मिक सोहळ्याला प्रारंभ केला. श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक असलेल्या गोकुळाष्टमीच्या दिवशी आयोजित या पूजेमुळे उपस्थित भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Viral Video: राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा 'व्होट चोरी'चा आरोप

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा 'व्होट चोरी'चा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी 'लापता लेडीज' या लोकप्रिय चित्रपटापासून प्रेरित होऊन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी जनतेला 'व्होट चोरी से आझादी' या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Goa News: सावर्डे पंचायतीची प्रलंबीत इमारत,कर्मचारी कमतरता दूर करणार

सत्तरीतील सावर्डे पंचायतीच्या रखडलेल्या नूतन इमारत प्रकल्पाचा पाठपुरवठा सरकार दरबारी सुरू. प्राधान्य क्रमाने हे काम हाती घेणार. पंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कमतरताही दूर करणार. स्थानीक आमदार मंत्री विश्वजीत राणेंची माहिती.सावर्डे पंचायतीच्या ग्रामसभेत हे सर्व प्रश्न आले होते ऐरणीवर.

Goa Crime: २० वर्षीय मुलगा वसतिगृहाच्या खोलीत मृत आढळला

२० वर्षीय बिट्स पिलानी येथील संगणक शास्त्राच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा कुशाग्र जैन हा वसतिगृहाच्या खोलीत मृत आढळला. वेर्णा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT