Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

मोपा विमानतळावर दारुचे शॉप सुरु करण्यास अडथळा, हायकोर्टाची गोवा सरकारला नोटीस; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Marathi Live Updates: 'कॅश फॉर जॉब' स्कॅम मधल्या पूजाला पाच दिवसांची पोलिस कोठडी.

Akshata Chhatre

मोपा विमानतळावर दारुचे शॉप सुरु करण्यास अडथळा, हायकोर्टाची गोवा सरकारला नोटीस

 पेडणे: उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दारुचे शॉप सुरु करण्यास अडथळा येत असल्याने मुंबई वाईन्स आणि ट्रेड्स यांनी न्यायालयात धाव घेतली. हायकोर्टाने याचिकेची दखल घेत थेट गोवा सरकारला नोटीस बजावली आहे.

गोमांस साठवून ठेवल्याबद्दल गोवा पोलिसांकडून तिघांना अटक

म्हापसा पोलिसांनी कमरखाझन म्हापसा येथील रहिवासी अप्पालाल बेपारी, मीरासाब बेपारी आणि सैफुद्दीन बेपारी या तिघांना त्यांच्या निवासी परिसरात वैध कागदपत्रे किंवा परवानगीशिवाय गोमांस साठवून ठेवल्याबद्दल अटक केली आणि या तिघांवर गोवा प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'कॅश फॉर जॉब' स्कॅम मधल्या पूजाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

'कॅश फॉर जॉब' स्कॅम प्रकरणी पूजा नाईक हिला पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आलीये. डिचोली पोलिसांनी अटक केलेल्या पूजाला आज बुधवार (दि. ३० ऑक्टोबर) रोजी डिचोलीच्या न्यायालयात हजर केले होते.

नोकरी घोटाळ्यात सामील असलेल्या प्रत्येकावर कारवाई होणार

नोकरी घोटाळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर १०० टक्के कारवाई केली जाईल, मात्र स्थानिकांनी अशा व्यक्तींबाबत सतर्क राहावे असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

यंदाची दिवाळी पावसात? राज्यात पुन्हा यलो अलर्ट

IMD ने गोव्यासाठी आज दिनांक 30 ऑक्टोबर ते उद्या दिनांक 1 नोव्हेंबर या कालावधीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान राज्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वारा (30-40 किमी प्रतितास) असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकता दिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिला 'विविधता से एकता' असा संदेश

आज (दि. ३० ऑक्टोबर) रोजी साखळीत रवींद्र भवन ते बसस्थानकापर्यंत एकता दौड आयोजित करण्यात आली होती आणि यात लहान विद्यार्थ्यांसह मुख्यमंत्र्यांनीही दौडीत सहभाग घेतला. दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी 'विविधता से एकता' यानेच हा भारत देश एकवटला आहे असे म्हणत जाती, धर्म, भाषा व प्रांता संदर्भात काही जण विभजन करण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र याला बळी न पडता विभाजनातून एकता दर्शवा असा संदेश दिला.

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त वाळपईत 'रन फॉर युनिटी' चे आयोजन

क्रीडा आणि व्यवहार संचालनालय सत्तरीतर्फे एकता दिवस साजरा करण्यात आला. विविध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊन रन फॉर युनिटी उपक्रम यशस्वी केला. वेळूस येथील श्री हनुमान विद्यालय ते कोपर्डे मैदान आणि कोपर्डे मैदान ते परत श्री हनुमान विद्यालय असे अंतर उपक्रमात सहभागी झालेल्यांनी पूर्ण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सरकारी जॉब स्कॅमनंतर मुख्यमंत्री सावंत अलर्ट मोडवर; पुढील नोकरभरती आयोगामार्फतच होणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात ड्राय डे, सीमालगतच्या भागात मद्य विक्रीस बंदी

Dr. V Candavelou: गोव्याच्या मुख्य सचिव पदावर आयएएस अधिकारी डॉ. व्ही. कँडवेलू यांची नियुक्ती

Goa Rain: ऐन दिवाळीत गोव्यावर पावसाचे सावट; IMD कडून तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa News: शॉर्ट सर्किटमुळे म्हापशात वकिलाचे ऑफिस जळून खाक; 2 लाख रुपयांचे नुकसान

SCROLL FOR NEXT