पणजी: सरकारी कर्मचारी भरतीसाठी पैसे घेतले गेल्याची प्रकरणे उघडकीस येऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापुढील भरती ही राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फतच केली जाईल, असे पुन्हा अधोरेखित केले आहे.
खात्यांतर्गत कर्मचारी भरती व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांवर मोठा दबाव होता. त्यांनी तसे अनेकदा बोलूनही दाखवले होते. तरीही आपल्या निर्णयावर मुख्यमंत्री ठाम राहिले आहेत.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना आज मुख्यमंत्री म्हणाले, नोकरभरती ही गुणवत्तेवर व्हावी, असे सरकारचे म्हणणे आहे. यासाठी कर्मचारी भरतीतून मानवी हस्तक्षेप उणा केला जात आहे.
संगणकावर आधारीत परीक्षा घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. जनतेने कर्मचारी भरती ही गुणवत्तेवरच होणार याची खात्री बाळगावी.
1) जाहिरातही प्रसिद्ध न झालेल्या पदांसाठी लोक भामट्यांना पैसे देऊ लागल्याचे आता उघड झाले आहे. पैशामुळे नोकरी मिळते असे नाही. काही प्रकार घडले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
2) दिवाळीनंतर आयोगाकडून कर्मचारी भरतीसाठी जाहिराती देणे सुरू होणार आहे. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड होणार आहे. मुलाखतही घेतली जाणार नाही.
3) त्यामुळे राज्यातील युवा वर्गाने नोकर भरतीत कोणत्याही प्रकारचा वशिला चालणार नाही आणि गैरप्रकार घडणार नाही याविषयी आश्वस्त रहावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.