Goa News: शॉर्ट सर्किटमुळे म्हापशात वकिलाचे ऑफिस जळून खाक; 2 लाख रुपयांचे नुकसान

Short Circuit at Mapusa: जुन्या आझिलो हॉस्पिटलजवळ असलेल्या आनंदवन इमारतीतीलआरके लॉ फर्म या अ‍ॅड. एन. नोरोन्हा यांच्या कार्यालयाला भीषण आग
Short Circuit at Mapusa: जुन्या आझिलो हॉस्पिटलजवळ असलेल्या आनंदवन इमारतीतीलआरके लॉ फर्म या अ‍ॅड. एन. नोरोन्हा यांच्या कार्यालयाला भीषण आग
Short Circuit at MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa, Goa

म्हापसा येथील जुन्या आझिलो हॉस्पिटलजवळ असलेल्या आनंदवन इमारतीतील आरके लॉ फर्म या अ‍ॅड. एन. नोरोन्हा यांच्या कार्यालयाला भीषण आग लागली. सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:20 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमुळे जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एसीचे शॉर्टसर्कीट झाल्याने संचाने पेट घेतला, यावेळी कार्यालयात विराज नामक कामगार होता.

कार्यालयाला आग लागताच विराजने ताबडतोब अग्निशामक दलाला पाचारण केले आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सुद्धा वेळ न दवडता घटनास्थळी पोहोचून खिडकीतून पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली.

Short Circuit at Mapusa: जुन्या आझिलो हॉस्पिटलजवळ असलेल्या आनंदवन इमारतीतीलआरके लॉ फर्म या अ‍ॅड. एन. नोरोन्हा यांच्या कार्यालयाला भीषण आग
Bus Accident: दिवाळीनिमित्त गोव्यातून नेपाळला जाणाऱ्या बसचा अपघात, लहान बाळासह आठ प्रवासी जखमी

त्यांनतर दलाचे उपाधिकारी प्रकाश कान्नाईक यांनी ऑक्सीजन सिलींडरचा आधार घेत कार्यालयात प्रवेश केला आणि आग विझवली. घडलेल्या एकूण प्रकारात अ‍ॅड. एन. नोरोन्हा यांचे नुकसान झाले, त्याची कागदपत्रे तसेच फर्निचर जाळून खाक झाले.

वाहतूक कोंडीवर तोडगा काढा

घटनास्थळी पोहोचत असताना एका कारने अग्निशामक दलाच्या वाहनाला बाजू दिली नव्हती आणि म्हणून अग्निशामक दलाचे उपअधिकारी प्रकाश कान्नाईक यांना स्वतः अर्धा किलोमीटर धाव घेत वाहनांना बाजूला सारत "अग्निशामक दलाच्या गाडीसाठी रास्ता मोकळा करून द्या" अशी विनंती करावी लागली.

एवढंच नाही तर रस्त्यावर असलेल्या काही दुचाकी त्यांनी स्वतः हलवल्या. एकूण प्रकारामुळे रस्त्यावर झालेल्या या वाहतूककोंडीवर तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी म्हापसा पालिकेकडे केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com