Live Updates

Goa Live Updates: विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करावा, कॅश फॉर जॉब प्रकरणी आमदार व्हेंझी यांचं आवाहान

Goa Marathi Updates: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी

Akshata Chhatre

विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करावा, कॅश फॉर जॉब प्रकरणी आमदार व्हेंझी यांचं आवाहान

सरकारी नोकरीसाठी इतका पैसा गोवावासीयांना परवडत नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बाहेर पडून या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केले आहे.

भंडारी समाजाची नवनिर्वाचित समिती बेकायदेशीर!

उच्च न्यायालयाने देवानंद नाईक यांची याचिका नियमित खंडपीठाकडे दाखल केली. 7 नोव्हेंबर रोजी जिल्हा निबंधक शेड्यूलसमोर यथास्थितीबाबत पुढील सुनावणी होणार. भंडारी समाजाची नवनिर्वाचित समिती बेकायदेशीर असल्याचे ॲड. अनिश बकाल यांनी सांगितले.

एफसी गोवा देणार पंजाब एफसीला कडवं आव्हान; मानोलो मार्केझ यांनी इरादे केले स्पष्ट

एफसी गोव्याच्या शेवटच्या सामन्यातील विजयानंतर, प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सांगितले की, 'संघ पंजाब एफसीला कडवे आव्हान देईल.' एफसी गोवा आणि पंजाब एफसी यांच्यातील हा सामना 6 नोव्हेंबर रोजी फातोर्डा स्टेडियमवर होणार आहे.

बेकायदेशीर घरांचे वीज व पाणी 'कनेक्शन कट'!

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोग्य कायद्या अंतर्गत बेकायदेशीर घरांना देण्यात येणारे वीज व पाणी कनेक्शन आता बंद होणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

कचरा व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री आक्रमक; सरपंच, सचिवांची घेतली शाळा

सरकार दरवर्षी कचऱ्यावर 300 कोटी रुपये खर्च करते. कचरा व्यवस्थापनाबाबत सरपंचांना इच्छाशक्ती आणि सचिवांना अक्कल हवी. यापुढे रस्त्यावर, खुल्या जागेत, ओहोळात कचरा दिसू नये. पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे पडून असून ते वापरा. या पैशांबाबत पंचायत सरपंचांना माहितीच नाही. डिचोली तालुक्यातील पंचायतींची मुख्यमंत्र्यांनी वाचली कुंडली.

मेणकुऱ्यात तलाठ्यावर जीवघेणा हल्ला

मेणकुऱ्याचे तलाठी फटगो पालकर (वय. ४७) यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी संजय नाईक आणि अशोक नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पालकर मेणकुऱ्यात जागची तपासणी करीत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, ज्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब प्रकरणी 'दीपाश्री'ला कोर्टाचा झटका; सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी

Goa Crime: एकाच दिवशी 2 रशियन नागरिकांचा गोव्यात मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरु

Goa Agriculture: गोव्यात मिरी लागवड क्षेत्रात वाढ! 350 टन उत्पादन; 868 हेक्टर क्षेत्रफळात लागवड

Canacona: काणकोणात विजेचा लपंडाव! भूमिगत वीजवाहिन्या घालूनही रड संपेना; उच्च दाबामुळे वीज उपकरणे निकामी

CM Pramod Sawant: गोव्यात '100 टक्के' विमा संरक्षण देण्याचे लक्ष्य! मुख्यमंत्र्यांनी केले महत्व अधोरेखित

SCROLL FOR NEXT