Marathi Breaking News  Dainik Gomantak
Live Updates

Goa Latest Updates: गँगस्टर अमरची रवानगी न्यायालयीन कोठडीत

Goa Breaking News Marathi: जाणून घ्या गोव्यातील राजकरण, क्रीडा,मनोरंजन आणि इतर घडामोडी

Sameer Amunekar

गँगस्टर अमरची रवानगी न्यायालयीन कोठडीत

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केलेल्या गँगस्टर अमर कुलाल (३७) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात उभे केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अमरला अटक केली होती. गेले दोन वर्षे तो पिडीतावर लैंगिक अत्याचार करीत होता. मुंगूल गॅंगवॉरप्रकरणी तुरूंगाची हवा खाऊन हल्लीच जामिनावर सुटल्यानंतर त्याने ६ जानेवारीला पुन्हा त्या मुलीवर अत्याचार केला होता. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सांतेमळ राय येथे अमरला पकडले होते.

दुर्भाट, आडपई फेरीसेवेवर दाट धुक्यामुळे परिणाम

दुर्भाट व आडपई येथून निघून रासईला जाणारी फेरीबोट सेवा आज सकाळी दाट धुक्यामुळे सात वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली. धुके कमी झाल्यानंतर साडेआठ वाजता ही फेरीसेवा पूर्ववत सुरू झाली.

१२०० भाविकांना घेऊन खास रेल्वे अयोध्येला रवाना

मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेंतर्गत मडगावच्या रेल्वे स्थानकावरून १२०० भाविकांना घेऊन खास रेल्वे आयोध्येला रवाना झाली. आमदार संकल्प आमोणकर, कृष्णा ऊर्फ दाजी साळकर, केदार नाईक व उल्हास तुयेकर तसेच समाज कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवून भाविकांना निरोप दिला.

Mapusa: म्हापशात ‘एफडीए’ची पुन्हा कारवाई

म्हापसा येथील अलंकार सिनेमागृहाजवळील अन्न व्यवसायांवर (फास्ट फूड बिझनेस) पाळत ठेवण्याची मोहीम राबवण्यात आली. यावेळी १८ अन्न व्यवसायांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६ व्यवसायांना यापूर्वीच्या तपासणीदरम्यान स्वच्छतेच्या मार्गदर्शक तत्त्वांवर प्रशिक्षण देऊनही अस्वच्छ आणि आरोग्यास हानिकारक पद्धतीने व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचे कामकाज थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. उर्वरित व्यवसायांना सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Old Buses in Goa: प्रवाशांचा जीव टांगणीला! गोव्याच्या रस्त्यांवर 779 'कालबाह्य' बसचा प्रवास सुरुच; प्रदूषणाचे नियम धाब्यावर

BCCI Central Contracts: रोहित-विराटचं होणार 'डिमोशन'? BCC लवकरच घेणार मोठा निर्णय; जडेजा अन् बुमराहालाही फटका

Feista Do Pavo: ..लोकांचा, लोकांद्वारे आणि लोकांसाठी असणारा ‘फेस्ता दो पावो’

Tourist Safety: पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; हॉटेल नोंदणीचे नियम बदलले! आता 'Fire NOC' बंधनकारक

VIDEO: महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 'DGP'वर निलंबनाची कारवाई, Viral व्हिडिओनंतर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT