VIDEO: महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 'DGP'वर निलंबनाची कारवाई, Viral व्हिडिओनंतर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

Ramachandra Rao Viral Video: कर्नाटक पोलीस दलातील सर्वोच्च पदावर कार्यरत असलेले पोलीस महासंचालक (DGP) दर्जाचे अधिकारी के. रामचंद्र राव यांना राज्य सरकारने मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले.
Ramachandra Rao Viral Video
Ramachandra Rao Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटक पोलीस दलातील सर्वोच्च पदावर कार्यरत असलेले पोलीस महासंचालक (DGP) के. रामचंद्र राव यांना राज्य सरकारने मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले. सोशल मीडियावर त्यांचे काही आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात आणि प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली असून, सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

नेमके प्रकरण काय?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने पसरत आहे, ज्यामध्ये रामचंद्र राव एका तरुणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असल्याचा आरोप आहे. हे व्हिडिओ २०१७ मधील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी आणि जनतेने संताप व्यक्त केला होता. या प्रकरणाची प्राथमिक दखल घेत कर्नाटक सरकारने तपासाअंती राव यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

Ramachandra Rao Viral Video
Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

के. रामचंद्र राव हे १९९३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेल्या राव यांनी शिक्षण क्षेत्रात पीएचडी पदवीही मिळवली आहे. मात्र, त्यांचे करिअर वादांनी वेढलेले राहिले आहे. २०१४ मध्ये जेव्हा ते दक्षिण परिमंडळाचे आयजीपी होते, तेव्हा त्यांच्यावर एका व्यापाऱ्याकडून पैसे लुटल्याचा आरोप झाला होता.

पोलिसांनी २० लाखांची जप्ती दाखवली होती, तर व्यापाऱ्यांच्या मते ती रक्कम २.२७ कोटी रुपये होती. तसेच, त्यांची अभिनेत्री मुलगी सोना हिला तस्करी प्रकरणात अटक झाली असून, तिला मदत केल्याच्या आरोपावरून राव यांना यापूर्वी सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आले होते.

षडयंत्र असल्याचा रामचंद्र राव यांचा दावा

या संपूर्ण प्रकरणावर रामचंद्र राव यांनी आपली बाजू मांडताना हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "हे व्हिडिओ ८ वर्षांपूर्वीचे असून मला बदनाम करण्यासाठी रचलेले हे एक षडयंत्र आहे." आपण बेलगावी येथे कार्यरत असतानाचे हे बनावट व्हिडिओ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली असून वकिलामार्फत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ramachandra Rao Viral Video
Old Buses Goa: 15 वर्षे झालेल्‍या 779 बसेस रस्त्यावर, प्रदूषणकारी 60 बसना चलन; ‘ई-बस’ कंत्राटदारांवर 77 कोटी खर्च

निवृत्तीच्या उंबरठ्यावर कारवाईचा बडगा

विशेष म्हणजे के. रामचंद्र राव याच वर्षी मे महिन्यात निवृत्त होणार होते. निवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असताना अशा प्रकारे निलंबनाची कारवाई होणे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. २०२३ मध्ये त्यांनी पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळली होती. आता या प्रकरणाच्या चौकशीतून नेमके काय सत्य बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com