क्रीडा

Aus Vs Zim: इतिहास घडला! बलाढ्य कांगारूना झिम्बाब्वेने पहिल्यांदाच नमवले

गोमन्तक डिजिटल टीम

झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया (Austalia) यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत एक इतिहास घडला आहे. क्रिकेट विश्वात बलाढ्य असलेल्या ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेने (zimbabwe) त्यांच्याच देशात पहिल्यांदाच हरवलं आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 141 धावा केल्या. झिम्बाब्वेने 39 षटकांत आव्हान पार करत, तीन गडी राखून ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला.

ऑस्ट्रेलियाने सुरूवातीला फंलदाजी करताना त्यांचे फंलदाज खास कामगिरी करू शकले नाहीत. सलामीवीर डेविड वॉर्नरने धडाकेबाज फंलदाजी करत, सर्वाधिक 94 धावा केल्या. या शिवाय ग्लेन मॅक्सवेलने 19 धावा केल्या. इतर कोणत्याही फंलदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही, आणि ऑस्ट्रेलियाचा संघ पत्त्याच्या पानांसारखा कोसळला. झिम्बाब्वेकडून फिरकीपटू रियान बर्लने तीन षटकांत ऑस्ट्रेलियाचे पाच गडी बाद केले. ब्रँड इव्हान्सने दोन गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेलेल्या झिम्बाब्वेचा देखील फार उत्तम सुरूवात झाली नाही. पण, त्यांचे खेळाडू सामना जिवंत ठेवण्यासाठी यशस्वी ठरले. झिम्बाब्वेकडून सर्वाधिक धावा रगिस चकाब्वा याने 37 धावा केल्या. तीन गडी राखून झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूडने सर्वाधिक तीन तर, स्टार्क, स्टॉईनिस, ग्रीन आणि अगर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT