अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा खेळाडू झाकी अनवारी याचा मृत्यू झाला आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Afghanistan फुटबॉल संघाचा खेळाडू झाकी अनवारी याचा विमानातून पडून मृत्यू

चालत्या विमानात चढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये झाकी अनवारी देखील होता, परंतू त्याचा तोल गेल्याने चालत्या विमानातून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सध्या भयानक परिस्थिती असून, तालिबानने (Taliban) आफगाणिस्तानवर ताबा मिळविला आहे. त्याचा परिणाम आता सर्व क्षेत्रात दिसत आहे. तेथील क्रीडा क्षेत्रावर देखील परिणाम झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशीच एक बातमी समोर अली आहे, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा खेळाडू झाकी अनवारी (Zaki Anwar, a member of the Afghan national football team) याचा मृत्यू झाला आहे.

तालिबानने कब्जा केल्यानंतर आफगाण नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, तेथे प्रत्येक जण आपला जीव वाचविण्यासाठी जीव मुठीत धरुन देश सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोक विमानाच्यावर बसून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्नात आहेत. हीच चूक अफगाणिस्तानच्या फुटबॉलपटू देखील केली ती त्याच्या जिवावर बेतली आहे. झाकी अनवारी याचा काबूलच्या विमानतळावर अमेरिकेच्या लष्करी विमानावरुन पडून मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रविवारी बंडखोर तालिबान्यांनी आफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर देश सोडून जाण्यासाठी अफगाण नागरिकांची विमानतळावर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अनेक जण विमानावर बसले, तर बऱ्याच जणांनी चालत्या विमानात चढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये झाकी अनवारी देखील होता, परंतू त्याचा तोल गेल्याने चालत्या विमानातून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. झाकी अनवारीच्या मृत्यूमुळे संपूर्ण फुटबॉल जगतावर शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Herof2: बलुचिस्तानमध्ये क्वेटासह 10 शहरांवर बलोच बंडखोरांचा ताबा, पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले; 10 ठार VIDEO

Pakistan Economy Crisis: "मुनीर अन् मी पैसे मागतो तेव्हा..." शहबाज शरीफ यांनी मांडली आर्थिक गुलामगिरीची व्यथा; परकीय कर्जाच्या अटींपुढे झुकला पाकड्यांचा कणा

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

Goa Politics: नितीन नवीन भाजपचे 'बिग बॉस', मुख्यमंत्री सांवतांकडून कौतुकाचा वर्षाव; आगामी निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार

SCROLL FOR NEXT