Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Dainik Gomantak
क्रीडा

धनश्री अन् युजी वेगळे होणार? Instagram वरून धनश्रीने काढले चहलचे आडनाव

चहल आणि धनश्रीच्या चाहत्यांना असे वाटते की आता या जोडीमध्ये काही चांगले चाललेली नाहीये.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचा (Team India) फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) त्याच्या जादुई गोलंदाजीसाठी ओळखला जातो. युझवेंद्र चहल सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असतो. तसेच त्यांची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिला देखील सोशल मीडिया क्वीन मानले जाते. या दोघांची जोडी सर्वात सुपरहिट कपल्सपैकी एक आहे. पण आजकाल ही जोडी वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. चहल आणि धनश्रीच्या चाहत्यांना असे वाटते की आता या जोडीमध्ये काही चांगले चाललेली नाहीये. (Yuzvendra Chahal shared a cryptic post as Dhanashree changed his last name on Instagram)

धनश्रीने चहल आडनाव काढून टाकले

आपल्या प्रेमाने भरलेल्या पोस्टमुळे चर्चेत असणारी धनश्री आणि चहलची जोडी सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. वास्तविक, काही काळापूर्वी धनश्री वर्माने चहलचे आडनाव आपल्या इंस्टाग्राम युजरनेममधून काढून टाकले आहे तसेच यापूर्वी इन्स्टाग्रामवर धनश्रीचे युजरनेम धनश्री वर्मा चहलच्या नावावर होते. मात्र अचानक तिने आपल्या नावामागील अडणाव दूर करून सर्वांनाच चकित केले आहे. असे का झाले याचा अंदाज लावता येत नाही, पण धनश्री आणि चहल यांच्यात काहीही चांगले चालले नसल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत.

चहलच्या पोस्टवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत

धनश्रीनंतर चहलच्या एका इंस्टाग्राम पोस्टनेही प्रश्न उपस्थित केले, चहलने प्रत्यक्षात एक गोष्ट सांगितली ज्यामध्ये असे लिहिले होते की एक नवीन जीवन सुरू होत आहे. या पोस्टवरून या दोघांच्या चाहत्यांनी असा तर्क बांधला आहे की या कपलमध्ये काहीतरी समस्या आहे. मात्र, या जोडप्याच्या बाजूने काय झाले याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाहीये. येत्या काही दिवसांत हे स्पष्ट होईलच की या दोघांमध्ये काय सुरू आहे.

अशी झाली होती ओळख

युजी आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट एका ऑनलाइन क्लासदरम्यान झाली होती. खरंतर चहलने धनश्री वर्माच्या क्लासमध्ये डान्स शिकण्यासाठी जॉईन झाला होता, इथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. धनश्री वर्मा डान्स कोरियोग्राफर आणि डेंटिस्ट देखील आहे तसेच धनश्रीचे नृत्याशी संबंधित एक यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलचे 26 लाखांहून अधिक यूट्यूब सब्सक्राइबर आहेत. तसेच धनश्री बॉलीवूड गाणी रिक्रिएट करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT